माझ्या आठवणीतील सर आदरनिय सरांबदल लिहायच म्हणजे शब्दच कमी पडतात कारण सर आम्हाला जे लाभले ते तसे पाचवीपासूनच पण आमचा वर्ग सरांकडे आला तो सह...
माझ्या आठवणीतील सर
आदरनिय सरांबदल लिहायच म्हणजे शब्दच कमी पडतात कारण सर आम्हाला जे लाभले ते तसे पाचवीपासूनच पण आमचा वर्ग सरांकडे आला तो सहावीचे इंग्रजी आणि इतिहास साठी,आम्ही तेव्हा जेमतेम बारा वर्षाचे होतो. आमच गाव म्हणजे करवीर मधल मध्यभागी असणारे गाव खेबवडे . तेव्हा गावात रस्ते नव्हते आमचे सर्व शिक्षक बाचणी पासून चालत यायचे तर कधी कागल वरून आले की बामणी फाट्यावरून चालत यायचे . . सर वर्गात आले की नेहमीच एक चेहऱ्यावर हास्य आणि नव्या उमेदीने प्रचंड आत्मविश्वासाने वर्गात यायचे सरांचा तास म्हणजे जणू सर्वानांच नवी अनुभूती सरांनी हसत खेळत शिकायच कस हे शिकवलं सरांना स्वतच्या गावचा चांदेकर वाडीचा सार्थ अभिमान.
सर इतिहास इंग्रजी तर छान शिकवायचे च पण आम्हा सर्व विद्यार्थ्यानां खऱ्या अर्थाने सर कळले समजले ते आर वाय सुतार सर मराठीचे शिक्षक म्हणूनच प्राचीन संत वाङ्ममय असो लिळाचरित असो वा मध्ययुगीन काव्य किंवा भवती रचनेपासून ते अत्रे . बा .भ .बोरकर .भा .रा. तांबे. माधव ज्युलियन .असो मर्ढेकर असो वा संत कवयित्री जसा एखादा कलाकार त्या पात्रांमध्ये घुसून पात्र रंगमंचावरती पडद्यावरती खऱ्या अर्थाने उतरवतो तसं सर नेहमी सगळे लेखक कवी कवयित्री कादंबरीकार प्रवास वर्णन काहीही कोणताही भाग शिकवताना त्यामध्ये इतके समरस होऊन शिकवायचे की आम्हाला मराठी शिकवत नव्हते तर मराठीचं गुणगान गात आम्हाला मराठीची गोडी लावत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करायचे . आणि आम्हाला विद्यार्थ्यांना ही नेहमी आनंदी राहा हेच शिकवायचे सर आयुष्याच्या मैदानात जर कधी वाईट वेळ आलीच तर आपले पाय घट्ट रोवून उभे रहा आणि लढत रहा..नेहमी म्हणायचे हेही दिवस जातील यावर विश्वास ठेवा.आपले प्रयत्न नेहमी निरंतर चालू ठेवा एक दिवस यशस्वी नक्कीच व्हाल हा आत्मविश्वास सरांनीच आमच्या पंखामध्ये भरला
प्रत्येक विद्यार्थ्याला सर जवळून ओळखत होते . एखादा गैरहजर असेल तर त्याचं कारण जाणून घेतल्याशिवाय सर पुढे जात नव्हते माझे विद्यार्थी हे हिरे आहेत हे सरांचं वाक्य नेहमी सर्वांच्या स्मरणात राहिलं कारण सरांचे विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत सर तुम्ही आयुष्यभर ज्ञानदान विद्यार्थी हेच माझे दैवत आणि विद्यार्थ्यांचं कर्तुत्व हीच माझी ओळख ..माझी ठेव पावती
म्हणून काम केलं. आम्ही भाग्यवंत की आपल्यासारखे गुरु आम्हास लाभले तुमचं एक वाक्य सर मला अजूनही माझ्या कानामध्ये घोंगावत ते म्हणजे गरीबीची कधीही लाज वाटून घेऊ नका कारण हीच गरिबी जीवनामध्ये तुम्हाला तुमची ओळख निर्माण करण्यास भाग पाडते.
सर तुम्ही एक उत्कृष्ट सूत्रसंचालक निवेदक तर होताच पण एक लेखक कवी आणि उत्कृष्ट चारोळी कार ही होता मला आठवतं सर तुम्ही एक हाडाचा शिक्षक तर होताच पण त्याच बरोबर एक खूप चांगला मार्गदर्शक म्हणून आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आलात जणू मातीच्या गोळ्याचीं सुंदर शिल्प तुम्ही तुमच्या संस्कारानी घडविली कारण विद्यार्थी दशेमध्ये खरी गरज असते ती दिशादर्शकाची. मार्गदर्शकाची आणि तीच तुम्ही भूमिका खूप छानपणे निभावलीचार गुण कमी पडले तरी चालेल पण आयुष्याच्या विद्यापीठात मात्र माझा एकही विद्यार्थी नापास होता कामा नये मागे राहता कामा नये हे नेहमी शिकवण तुम्ही आम्हाला दिली.तुम्ही एकटेच पूढे न जाता इतरांना ही घेऊन पुढे जा.मदत करा.एक चांगला माणूस अगोदर बना... कर्तृत्वाने सिध्द करा हे तुम्ही आम्हाला शिकवलं
लेखक कवी निवेदक सूत्रसंचालक शिक्षक याच बरोबर तुमचं सामाजिक कार्य एक सरपंच म्हणून ही खूप छान होतं
आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे ती तुमच्यासारख्या निष्ठावंत विद्यार्थी केंद्रित शिक्षकाची
आपुल्या हाती नसते काही हे समजावे कुणी दिले जर हात आपुले. हाती घ्यावे. ही मंगेश पाडगावकरांची कविता सार्थ आठवते सर तुम्ही आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी झगडणारे माझे विद्यार्थीच माझ्यासाठी सर्वस्व आहे म्हणून तुमचं कार्य केलं
सर तुम्ही नेहमी आम्हाला सांगत होता माणसानं जपानी बाहुली प्रमाण असावं टाकेल तिथं उभेच राहिले पाहिजे..म्हणजे तुम्हाला लढता आलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत पडलात तर पुन्हा उठता आलं पाहिजे..
मला आठवते सर संत वांड्मय शिकवताना तर संत नामदेव असो तुकाराम असो वा संत मीराबाई कोणतेही कोणतेही संत जेव्हा तेव्हा भक्तिरसात बुडालेली असायचा तुम्ही अध्यात्म भक्ती सात्विकता आहार विचार वर्तन या सगळ्या गोष्टी इतक्या छान आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर बिंबवल्या की आज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्ही ठामपणे निर्धाराने उभे आहोत जीवनात कष्टाला पर्याय नाही अविरतपणे आपल्या मार्गावरून प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आपलं कार्य करत राहायचं तुम्ही नेहमी हेच आम्हाला सांगत आला आपलं काम कष्ट इतकं चोख आणि प्रामाणिक ठेवा की नशिबाला तुमच्या प्रयत्नांपुढे झुकावच लागेल हे वाक्य आजही कानांमध्ये घोंगावत आहे सर.
तुमच्या संपर्कात येणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांना तुम्ही आत्तापर्यंत प्रोत्साहन देत आला मला आठवतं सर मी आपल्या संभाषणात एकदा बोलून गेले होते की मला तुमच्या सारखा शिक्षक व्हायचं आहे ...मला राजे फाउंडेशन चा 2023 चा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला तेव्हा सर मी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही मला दाटलेल्या कंठाने आशीर्वाद दिला होता तो मला जीवनभर प्रेरणा देत राहील ...ओ माय गॉड ..ओ माय गॉड ..माझ्या बाळा मी आज खूप धन्य धन्य झालो मी आज खऱ्या अर्थाने मोठा झालो अशीच खूप मोठी हो नेहमी आनंदी राहा म्हणून भरभरून तुम्ही कौतुक केले सर तुमच्या नेहमीच्या सुरात तुम्ही बोलून गेलात.
आज खरंच गरज आहे ती सर तुमच्यासारख्या हरहुन्नरी प्रेमळ विद्यार्थ्यांना समजून घेऊन अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची तुमच्या जीवनाचे अनेक पैलू सर समोर येतात आणि वाटतं परत एकदा ते दिवस पुन्हा यावेत तुम्ही अध्यापन करावे आणि आम्ही अध्ययनार्थी व्हावे. कठोर परिश्रमानी जीवनाचं नंदनवन कसं फुलवावं अडचणींवर मात करून यशस्वी होवून आपली ओळख कशी निर्माण करावी..आणिआपला आदर्श प्रामाणिकपणा निष्ठा कशी सिध्द करावी हे तुम्ही आम्हाला शिकवलं .. ऐसा पुत्र व्हावा गुंडा.. त्याचा तिन्ही लोकी झेंडा.. हे संत तुकारामांच्या भाष्यावर तुम्ही आम्हाला खूप आत्मसन्मानाची कर्तुत्व संस्कारांची आठवण करून देत होता मला आठवतं सर तुम्ही फक्त अध्यापनच करत नव्हता तर विद्यार्थ्याला सांगोपांग वाचत होता सर तुमच्यासारखा गुरु भेटणं .....होणं नाही... तुमच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही.
शब्दाकंन- विद्या शिंदे(मडिवाळ)
श्री शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज
No comments