Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री. राहुल यशवंत कुंभार यांची जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कारासाठी निवड*

 *श्री. राहुल यशवंत कुंभार यांची जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कारासाठी निवड*  _*8 डिसेंबर रोजी पुरस्कराचे कोल्हापूरात होणार...

 *श्री. राहुल यशवंत कुंभार यांची जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कारासाठी निवड* 



_*8 डिसेंबर रोजी पुरस्कराचे कोल्हापूरात होणार वितरण ; मित्र परिवाराकडून श्री. राहुल यशवंत कुंभार यांचे अभिनंदन*_


कोल्हापुर (प्रतिनिधी)- सागर शेळके 

कोल्हापुर  जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावचे  सामाजिक कार्यकर्ते  तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी तालुका अध्यक्ष *श्री. राहुल यशवंत कुंभार* यांना जिल्हास्तरीय  *कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव* पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 5  वाजता  स्व. पांडुरंग दादोबा माने सांस्कृतिक भवन.दत्त मंदिर जवळ, फुलेवाड़ी, कोल्हापूर या  ठिकाणी पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती  *द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सागर शेळके* यांनी दिली. श्री. राहुल यशवंत कुंभार  यांना जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

       द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, राजकीय, सामाजिक,संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावातील व भागातील विधार्थी ना न्याय मीळउन दिला आहे त्याच बरोबर राजकीय व सामाजिक जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळणे, जातीय सलोखा, सण, उत्सव,  अन्याया विरुद्ध लढा सह आदी प्रभावी कामे पार पाडल्यामुळे श्री. राहुल यशवंत कुंभार  यांची  कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जिल्हास्तरीय  पुरस्कारासाठी निवड जाहिर झाली असल्याची माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापुर जिल्हाध्यक्ष सागर शेळके , उपजिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र सूर्यवंशी, प्रा बाबूराव घुरके, अभिजीत पाटील, नारायण लोहार, बाजीराव पाटील, युवराज वरुटे, अभिजीत पाटील , अग्नेल चव्हाण, गोरख कांबळे, मंगेश उबाळे ,  रोहन भीउगडे, लखन तलवारे, कैयुम शेख, शौकत माणगावे, सातापा कांबळे, सचिन पोवार, भरत शिंदे, पाडूंरग बेलेकर , हर्षद कुंभोज ,सुभाष भोसले, विजय मोरबाळे यांनी दिली आहे. 

             कोल्हापुर राधानगरी येथील  तुरंबे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल यशवंत कुंभार यांनी अन्यायाविरुद्ध लढा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री. राहुल कुंभार  यांना पुरस्कारासाठी निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

No comments