चितळी येथील प्रगतशील शेतकरी अशोक दादा ताठे मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित- अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-चितळ...
चितळी येथील प्रगतशील शेतकरी अशोक दादा ताठे मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित-
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-चितळी ता पाथर्डी येथील प्रगतीशील युवा शेतकरी अशोक ताठे यांना भारतिय कृषी संशोधन संस्था आयसीएआर (ICAR) यांच्या वतीने शेतीतील उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रीय स्तरावरील “मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया”(MFOI) हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार दिल्ली.पुसा येथे कृषी जागरण आणि आयसीएआर (ICAR) यांच्या संयुक्तपणे आयोजित आयसीएआरच्या पुसा कॅम्पसमधील एका कार्यक्रमात मिळाला. या पुरस्कारासाठी त्यांची निवड आयसीएआर (ICAR) या संस्थेने केली होती. अशोक ताठे हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे रहिवासी असून मागील काही वर्षापासून प्रयोगशील शेती करत आहेत.
शेतीत नवनवीन गोष्टींचा अवलंब करत शेती फायद्याची कशी करता येईल यावर त्यांचा भर असतो. बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अग्री इनपुट ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या या सगळ्या प्रवासात बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
भारतातून एकूण 22000 शेतक-यांनी या पुरस्कारारासाठी अर्ज केले होते. सदर कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी पुसा कॅम्पसमध्ये उपस्थित होते.
No comments