Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

विघ्नहर्ता अर्बनचा दिनदर्शिका अनावरण सोहळा संपन्न-श्री राजेश फटांगरे (संस्थापक अध्यक्ष)

  विघ्नहर्ता अर्बनचा दिनदर्शिका अनावरण सोहळा संपन्न-श्री राजेश फटांगरे (संस्थापक अध्यक्ष) अहिल्यानगर प्रतिनिधी-(श्री बाळासाहेब कोठुळे)-काशी ...

 विघ्नहर्ता अर्बनचा दिनदर्शिका अनावरण सोहळा संपन्न-श्री राजेश फटांगरे (संस्थापक अध्यक्ष)




अहिल्यानगर प्रतिनिधी-(श्री बाळासाहेब कोठुळे)-काशी ही ज्ञानभूमी अयोध्या ही वैराग्य भूमी नर्मदा नदीचा किनारा हि तपोभूमी अन महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी ही खऱ्या अर्थाने नवउद्योजकांची भूमी म्हणून ओळखली जाते याच गावामध्ये विघ्नहर्ता अर्बन या संस्थेने 2025 च्या दिनदर्शिकेचे उद्घाटन ग्रामस्थ व सभासदांच्या उपस्थितीमध्ये केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश फटांगरे यांनी दिली तीन वर्षांपूर्वी पाडळी या ठिकाणी संस्थेचे कार्यालय सुरू करण्यात आले असून प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेने पंढरीच्या पांडुरंग व रुक्माई ची मूर्ती सभासदांना भेट दिली होती व सभासदांचा एकची सन्मान केला होता तदनंतर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त केशर आंब्याची 101 झाडे देऊन सभासदांना वृक्ष संवर्धन करण्याचा अनमोल मंत्र संस्थेने दिला आपल्या आर्थिक नियोजना बरोबरच सामाजिक बांधिलकीची व माणुसकीची जपणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेने केला आहे तसेच सामाजिक कार्याबरोबर धार्मिक कार्यातही संस्था किंचितही मागे नाही दरवर्षी गणेश उत्सवामध्ये कार्यालयामध्ये श्री गणेशाची स्थापना करून गावच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते नित्यनेमाने आरती केली जाते व जो मानकरी असेल त्याला श्री ची मूर्ती देऊन किंवा प्रतिमा देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित सन्मान केला जातो श्री राजेश फटांगरे यांचे दूरगामी विचार आर्थिक सचोटी व वेळेचे नियोजन यामुळे संस्था तीन वर्षांमध्ये उच्चांकी यश संपादन करू शकली आहे शाखेमध्ये दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली त्यामध्ये सेविंग खाते एस एम एस सुविधा सोनेतारण कर्ज सुविधा मोबाईल नेट बँकिंग चेक क्लिअरिंग सुविधा दैनंदिन कलेक्शन सुविधा लाईट बिल भरणा सुविधा मिनी एटीएम तसेच व्यावसायिक कर्ज महिला बचत गट व कर्ज सुविधा आयएफसी कोड सुविधा तसेच भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व काढण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी दिली तसेच गुंतवणूकदारासाठी स्वप्नपूर्ती मासिक उत्पन्न ठेव योजना लाडकी लेक ठेव योजना दम दुप्पट ठेव योजना दाम दीडपट्टी योजना अल्प मुदत ठेव योजना स्वप्नपूर्ती ठेव योजना यासारख्या ग्राहकांना व ठेवीदारांना आर्थिकदृष्ट सतुष्ठ करणाऱ्या अनेक योजनांची माहिती श्री फटांगरे साहेब यांनी यावेळी दिली संकष्ट चतुर्थीचे अवचित साधत व विघ्नहर्ता या नावाला साजी सा अशी श्री ची प्रतिमा  दिनदर्शिकेच्या अग्रभागी मुद्रित करण्यात आली असून उत्कृष्ट छपाईसह संस्थेच्या अनेक योजनांची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे तसेच दैनंदिन घडामोडीचाही लेखाजोगा यामध्ये मांडला आहे सभासदासह नागरिकांनी या दिनदर्शिकेचे तोंड भरून कौतुक केले आहे यावेळी गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्रामस्थ संचालक मंडळ व संस्थेचे कर्मचारी यांच्यासह ठेवीदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

No comments