मा.सखाराम भणगे यांचा सत्कार करताना नगरसेवक श्रीधर पाटील व मित्रपरिवार कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार श्री.सखाराम बाळू भणगे यांना 8 डिसें...
मा.सखाराम भणगे यांचा सत्कार करताना नगरसेवक श्रीधर पाटील व मित्रपरिवार
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
श्री.सखाराम बाळू भणगे यांना 8 डिसेंबर रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा यांचेमार्फत आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेने त्यांना हा पुरस्कार दिला आहे.त्यांनी गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.तसेच अनेक सामाजिक संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत.जेथे कमी तेथे आम्ही या उक्तीप्रमाणे ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.
त्यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्ह्यातर्फै आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बदलापूर (मुंबई) येथील मा.नगरसेवक श्रीधर पाटील व त्यांच्ये मित्रमंडळ , भगिनी तर्फे सखाराम भणगे व त्यांची पत्नी सौ.कुसूम भणगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.नगरसेवक श्रीधर पाटील यांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शेवटी सत्कारमूर्ती सखाराम भणगे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments