Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार

  महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक जनरल एम्लाईज युनियनच्या वतीने २८ व्या पोर्ट ट...

 महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार



मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक जनरल एम्लाईज युनियनच्या वतीने २८ व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विषेशाषांकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले बॅलार्ड पिअर येथिल पोर्ट ट्रस्टच्या विजयदिप काॅन्फरस हाॅलमधे जेष्ठ कामगार नेते ॲड एस के शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि व्यंगकवी आमदार श्री रामदास फुटाणे आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सचिव श्री पी एन बाहेकर यांच्याहस्ते दिप प्रज्वलन आने प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली.

याप्रसंगी रामदास फुटाणे आपल्या मार्गदर्शन भाषणात पुढे म्हणाले की मुंबई एअरपोर्ट जसे अदाणीच्या ताब्यात गेले तसेच वाढवण बंदर देखिल भविष्यात अदाणीच्या ताब्यात जाईल सत्ताधाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करून समाज व्यवस्था खिळखिळी केली आहे जातीच्या नावाखाली आंदोलने केली जातात समाज घडविण्याऐवजी समाजमोडण्याचे काम चालू आहे राजकारणात आपणाला खुप जागरूक राहिले पाहिजे राजकारणात तळमळीपेक्षा मळीचाच जास्त वास येतो आज संक्रिय राजकारणी दुस-या बाजुला आहेत.समाज जस जीवन जगतो तस आम्ही लेखन करतो.समाजाच्या सुखदुःखाशी आपण समरस असले पाहिजे कोरोनाने आपणास खुप काही शिकविले.त्यापासन आपण धडा घेतला पाहिजे आपणास सध्याचे अर्थकारण बदलल पाहिजे चांगभल या कवितेतून सर्वांच भल होवो असा संदेश दिला आहे.पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकात महाराष्ट्र भुषण डॉ खंडू माळवे राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांची कविता "शब्द शब्द जपून ठेव" जरूर वाचावी दिवाळी अंकात  पन्नास टक्के लोक लिहितात.दिवाळी अंक वाचल्याने आपली वैचारिक पातळी वाढते जेष्ठ कामगार नेते ॲड एस के शेट्टे अध्यक्षीय भाषणात सांगितले की निष्ठावंत कार्यकर्ते ही युनियनची खरी शक्ती आहे.रामदास फुटाणे यांच्या स्मरणशक्तीला मी सलाम करतो त्यांचे मार्गदर्शन हे हास्य फुलविणारे आहे प्रास्ताविक कार्यकारी संपादक मारूती विश्वासराव यांनी केले.पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खोसे यांनी केले सभेचे सुत्रसंचालकन सतिश घाडी यांनी केले आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनघुटकर गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायणन गव्हाणे नुसीचे मकरंद खान यादी मान्यवर उपस्थित होते संगीता कदम,शिला भगत,योगीनी दुरापे यांनी स्वागत गीत म्हटले या प्रसंगी मान्यवर व लेखकांना पोर्ट ट्रस्ट कामगार अंक देवून सन्मान करण्यात आला.प्रकाशन सोहळ्याला युनियनचे आजी ,माजी ,पदाधिकारी, कार्यकर्ते,पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार,खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व साक्षी आमदार रामदास फुटाणे यांचे हस्ते महाराष्ट्र भुषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार करण्यात आला.


राष्ट्रीय कवी 

डॉ खं र माळवे-खरमा 

9967394281

No comments