एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीची स्थापना [तालुकाध्यक्ष पदी कार्तिक कांबळे ची निवड] अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे...
एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीची स्थापना
[तालुकाध्यक्ष पदी कार्तिक कांबळे ची निवड]
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- : वेदनेला फुंकर माणुसकीची हे घोषवाक्य घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभर शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरण क्षेत्रात अहोरात्र काम करणारी एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था आजपर्यंत केंद्रीय कार्यकारिणी, कोअर कमिटी, विभागीय, जिल्हा, तालुका स्तरावर जनरल बाॅडीसह महिला आघाडी, युवक आघाडीच्या माध्यमातून कामकाज पाहत आहे. परंतु विद्यार्थी आघाडीची स्थापना करत फाउंडेशनने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा संकल्प केला असल्याचे फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
शिरूर का.शहरातील आयडॉल क्लासेस मध्ये एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य साहित्यिक अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव पत्रकार गोकुळ पवार, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, कोअर कमिटीचे सदस्य कैलास खेडकर फौजी, प्रदेश संघटक देवीदास शिंदे आणि संस्थापक सदस्य मधुकर केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.12 डिसेंबर रोजी एकता फाउंडेशन शिरूर तालुका विद्यार्थी आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
कार्तिक लहू कांबळे, पिंपळनेर (तालुकाध्यक्ष), सुमित दिलीप केदार, वारणी (उपाध्यक्ष), महारूद्र गहिनीनाथ बारगजे, बारगजवाडी (उपाध्यक्ष), विशाल हौसराव पानखडे, पिंपळनेर (सचिव), प्रविण मल्हारी केदार, वारणी (कोषाध्यक्ष), प्रविण महादेव खेडकर, वारणी (सहसचिव), सुरज रामनाथ कदम, पिंपळनेर (संघटक), आदित्य आप्पा मस्के, मदमापुरी (निमंत्रक), सागर बाळू काकडे, सिंदफना (प्रसिद्धी प्रमुख), निखिल प्रभाकर वीर, सिंदफना (सदस्य), आदित्य पांडुरंग जायभाये, पिंपळनेर (सदस्य), ओंकार पप्पू जायभाये, पिंपळनेर (सदस्य), राजेश शरद केदार, वारणी (सदस्य), रितेश हरिभाऊ साळुंके, सिंदफना (सदस्य), परसराम बाजीराव बारगजे, पिंपळनेर (सदस्य), सोमेश्वर दशरथ साबळे, वारणी (सदस्य) याप्रमाणे पुढील दोन वर्षांसाठी तालुका कार्यकारिणीची घोषणा एकताच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
[चौकट - या निवडीनंतर आगामी 7 वे एकता मराठी साहित्य संमेलन, दहिवंडी च्या पुर्वतयारीसाठी एकताच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. बैठकीस साहित्यिक अनंत कराड, पत्रकार गोकुळ पवार, शिवलिंग परळकर, प्रवक्ता मल्हारी खेडकर, देवीदास शिंदे, मधुकर केदार यांची उपस्थिती होती. येत्या जानेवारीत एकताचे संमेलन घेण्याबरोबरच संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख अतिथींच्या नावावर चर्चा करण्यात आली. एकताच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कारांची घोषणा लवकरच करण्याचेही बैठकीत ठरले.]
No comments