मा.राज साहेब ठाकरे आणि मनसे, नव्या भरारीसाठी तयार.. राजकारणात जिंकणे-हारणे हे चढ-उताराचं चक्र आहे. निवडणुका येतात, जातात, पण पक्षाची विचारध...
मा.राज साहेब ठाकरे आणि मनसे,
नव्या भरारीसाठी तयार..
राजकारणात जिंकणे-हारणे हे चढ-उताराचं चक्र आहे. निवडणुका येतात, जातात, पण पक्षाची विचारधारा, पक्षाचा कार्यकर्ता आणि जनतेशी असलेलं नातं हेच पक्षाचं खऱ्या अर्थाने बलस्थान ठरतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी व पदाधिकारी यांचा
मा. राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास आहे.
मा.राज साहेब ठाकरे हे आपल्या ठाम आणि स्पष्ट विचारांसाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमध्ये प्रचंड ऊर्जा, वेगळी दृष्टी, आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीचा ठाम निर्धार दिसून येतो.
मागील काही निवडणुकांमध्ये व आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण त्यामुळे कट्टर मनसे सैनिकांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झालेला नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तत्त्वांवर चालणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा अभिमान, रोजगाराचा मुद्दा, मराठी अस्मिता,स्वच्छ, पारदर्शक राजकारण यासाठी पक्ष संघर्ष करत राहिला आहे.
कार्यकर्त्यांची ताकद, संघटनशक्ती, आणि जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याची क्षमता यामुळे मनसे पुन्हा भरारी घेईल, याबाबत कोणतीही शंका नाही.
पुन्हा उभारीसाठी काय आवश्यक आहे.?
१. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं बळकटीकरण: प्रत्येक शहर, गाव, वाडी-तांड्यापर्यंत पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि लोकांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढवण्याची गरज आहे.
२. तरुणाईचं योगदान:
युवकांसाठी रोजगार, शिक्षण, आणि भविष्यासाठी आशादायी धोरणं तयार करणे ही काळाची गरज आहे.
मा.राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षित होतो.
३. महाराष्ट्राभिमानाचा ठेवा: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, आणि आर्थिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत लोकांना भावनिकदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल.
कट्टर मनसे सैनिकांसाठी हीच संधी आहे की त्यांनी जोमाने पुन्हा कामाला लागावं. मा. राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचं काम करत राहावं.
उदयोन्मुख भविष्यासाठी पक्षाचं ब्रीद वाक्य:
हरणे किंवा जिंकणे याला तात्पुरतं महत्त्व आहे; पण खऱ्या अर्थाने जिंकतो तोच, जो लोकांसाठी सतत कार्य करत असतो.
मा.राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पुन्हा एकदा नव्या भरारीसाठी सज्ज होईल, याबद्दल कोणताही कार्यकर्ता साशंक नाही. विजयाची गोष्ट वेळेवर ठरेल, पण पक्षाची चळवळ सतत चालू राहील..!
एक शायर असं म्हणतो..
ज़मीर ज़िंदा रख,
कबीर जिंदा रख..
सुल्तान भी बन जाए,
तो दिल में फ़क़ीर ज़िंदा रख..
हार जा चाहे,
जिंदगी में सब कुछ..
मगर,
फिर से जीतने की ,
उम्मीद जिंदा रख..
ॲड.जमील देशपांडे
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव
No comments