सम्राटच्या गडकिल्ले बांधणी स्पर्धेत बिरंजे पाणंद येथील अष्टविनायक मित्र मंडळाचा किल्ले विशाळगड प्रथम ” सम्राट मित्र मंडळ, चव्हाण ग...
सम्राटच्या गडकिल्ले बांधणी स्पर्धेत बिरंजे पाणंद येथील अष्टविनायक मित्र मंडळाचा किल्ले विशाळगड प्रथम ”
सम्राट मित्र मंडळ, चव्हाण गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर यांच्या वतीने दिपावली मध्ये किल्ले बांधणीची परंपरा जपण्यासाठी भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील गड किल्ले आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि अन्याय विरुद्ध केलेल्या संघर्षाची जिवंत स्मारके आहेत. हा पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला समजावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. कसबा बावडा व परिसरात खुल्या स्वरुपात स्पर्धा घेण्यात आली. किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये बिरंजे पाणंद येथील अष्टविनायक मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र आणि पुस्तक देण्यात आले.
या स्पर्धेतील उत्कृष्ट गाईड विशेष पारितोषिक कु. जान्हवी ताटे आणि गंधर्व दाभाडे यांना देण्यात आला. किल्ला स्पर्धेचे आयोजन मानसिंग चव्हाण आणि योगेश चव्हाण यांनी केले. कमलाकर जाधव आणि कृष्णाली चव्हाण यांनी स्पर्धेतील किल्ल्यांचे परीक्षण केले.
कार्यक्रमास श्री संदीप खांडेकर (अध्यक्ष: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, किल्ले रायगड), श्री प्रवीण हुबाळे (सचिव : सह्याद्री प्रतिष्ठान, कोल्हापूर), श्री प्रदीप थोरवत (प्रशिक्षक: सह्याद्री प्रतिष्ठान बावडा आखाडा), राहुल माळी, श्री राहुल चव्हाण, श्री संभाजी चव्हाण, अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी विनायक चव्हाण, रितेश चव्हाण, गणेश पाटील, पवन चव्हाण, सार्थक चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.
*किल्ला बांधणी स्पर्धेचा सविस्तर निकाल :*
*प्रथम क्रमांक :* अष्टविनायक मित्र मंडळ (किल्ले विशाळगड)
*द्वितीय क्रमांक (विभागून) :* श्री गणेश पूजा मित्र मंडळ (पद्मदुर्ग) आणि श्रीराम कॉलनी, बिरंजे पाणंद (राजहंसगड)
*तृतीय क्रमांक :* DNK Boy's (केंजळगड)
*उत्कृष्ठ संकल्पना (विशेष सन्मान) :* चॉईस दयावान बाबा ग्रुप (मल्हारगड)
*उत्तेजनार्थ क्रमांक १ :* छत्रपती शंभुराजे फ्रेंड्स सर्कल (पन्हाळा)
*उत्तेजनार्थ क्रमांक २ :* ब्रदर्स ग्रुप (किल्ले खांदेरी)
*उत्कृष्ट गाईड विशेष पारितोषिक :* कु. जान्हवी ताटे आणि गंधर्व दाभाडे
स्थळ : चव्हाण गल्ली, कसबा बावडा
दिनांक : ३० नोव्हेंबर २०२४
*आयोजक*
*मानसिंग चव्हाण* (इतिहास अभ्यासक)
*योगेश चव्हाण*
( सम्राट मित्र मंडळ किल्ला बांधणी स्पर्धा सन २०२४ )
मो.नं. ९०२१२५१४९३, ७९७२१६७३९८.
No comments