Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

दादा पाटील राजळे महाविद्यालयात संविधान दिन साजरा-

 दादा पाटील राजळे महाविद्यालयात संविधान दिन साजरा- अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने द...

 दादा पाटील राजळे महाविद्यालयात संविधान दिन साजरा-



अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागा मार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.जे. टेमकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि प्रामुख्याने मसुदा समितीच्या कामकाजाचा आढावा घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदाना  विषयी  माहिती दिली. तसेच भारतीय संविधानामुळे भारतीय नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली. राष्ट्रप्रेम वाढीस लागले आपण एका देशाचे नागरिक आहोत ही भावना रुजली गेली तसेच भारताने 75 वर्षात जो काही विकास केलेला आहे. त्याचं श्रेय बऱ्याच अंशी भारतीय संविधानाला जाते. भारतीय संविधान निर्मितीच्या पूर्वी भारतीय समाज व्यवस्था विषमता मुलक होती. संविधानाच्या निर्मितीमुळे प्रामुख्याने भारतीय समाज व्यवस्था समतामुलक  होण्यास मदत झालेली आहे. भारतीय संविधानातील मूल्य आणि तत्वे यांचा भारतीय नागरिकांनी अंगीकार केल्यास निश्चितच भारतीय नागरिकांची उन्नती होऊन भारतीय लोकशाही सक्षम होण्यास सुरुवात होईल. असे प्रतिपादन आपले प्रस्तावितकेत प्राचार्य डॉ. आर .जे. टेमकर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.  विलास बनसोडे यांनी केले. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास विज्ञान विभाग प्रमुख डॉ . जनार्दन नेहुल, कला शाखा विभाग प्रमुख डॉ.तांबोळी एम.एस ., संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत पानसरे ,  डॉ.जे.टी. कानडे, परीक्षा अधिकारी डॉ. जी.बी.लवांडे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजकुमार घुले, डॉ. साधना म्हस्के, प्रा.  डी बी गायकवाड, डॉ.एस .आर. भराटे, डॉ. किशोर कुमार गायकवाड, डॉ. राजू घोलप, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आसाराम देसाई, डॉ. अतुलकुमार चोरपगार,  विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.दशरथ दळवे, प्रा. सोमनाथ चांदणे , प्रा. महेश लवांडे, श्री. नंदू आहेर उपस्थित होते . सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments