Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

एकताची साहित्य चळवळ नवलेखकांसाठी पोषक - प्रा.डाॅ.भास्कर बडे

  एकताची साहित्य चळवळ नवलेखकांसाठी पोषक - प्रा.डाॅ.भास्कर बडे अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- वाचन, चिंतन व मनन ही यशाची त्रिसूत्री...

 





एकताची साहित्य चळवळ नवलेखकांसाठी पोषक - प्रा.डाॅ.भास्कर बडे


अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- वाचन, चिंतन व मनन ही यशाची त्रिसूत्री असून नवीन पिढीने दर्जेदार साहित्य खरेदी करून ते आवर्जून वाचले पाहिजे. यशाला शाॅर्टकट नसतो. ती एक प्रक्रिया असून आज आपणाला जे जे प्रथितयश दिसतात ते सगळे या प्रक्रियेतून गेलेले आहेत. मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील नवकवी, लेखकांच्या लेखणीला बळ मिळावे म्हणून गेल्या 8-10 वर्षांपासून एकता फाउंडेशन ने उभारलेली चळवळ प्रशंसनीय असल्याचे मत जेष्ठ कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी व्यक्त केले. म.ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित 32 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.डाॅ.सुनिता सांगोले यांनी केले.

         एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणीचे संचालक जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, प्रवक्ता मल्हारी खेडकर, विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, मुक्त सृजनचे अध्यक्ष प्रा.डाॅ.महेश खरात, जेष्ठ कवयित्री नयन राजमाने, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कविसंमेलनात डाॅ.सांगोले यांनी 'मुखवटा' व 'तू नसताना' या दर्जेदार कविता सादर केल्या. इंजि.जयराम कदम (जालना) यांच्या 'हरवलेला संवाद' व 'लोकशाही' या रचना वेगळ्या धाटणीच्या होत्या. अहिल्यानगर चे कवी दशरथ शिंदे यांच्या 'बाई शाळंच्या गं दारी' व 'गरीबाची गाय' या गेय कवितांनी श्रोते भारावून गेले. दिपक पांढरे (माजलगाव) यांनी 'अमृत वचन' रचना सादर केली. त्यानंतर पैठण जि.संभाजीनगर येथील कवी रविंद्र काळे यांनी 'पुस्तकं' ही कविता ऐकवून रसिकांना अंतर्मुख केले. अहमदपूर जि.लातूर येथील मुरहारी कराड यांची 'सुरवात' ही कविता लक्षवेधी ठरली. 'घेत आहे काळजी इतकी तुझी' ही गझल खामगाव जि.बुलढाणा येथील युवाकवी निखिल चोपडे याने पेश करून संमेलनात रंगत आणली. उदगीर जि.लातूर चे कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी 'गोट्यांचा डाव' व 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर' या दिर्घ कवितेतील एक तुकडा पेश करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिरूर कासार चा युवाकवी कार्तिक कांबळे याने 'भारतीय म्हणून जगावं' ही रचना पेश केली. आष्टी जि.बीड चा युवाकवी नवनाथ पोकळे याने 'भरली शिक्षणाने झोळी', सुरेखा कुलकर्णी (सातारा) यांनी 'सावित्री', नागेश बोंतेवाड (संभाजीनगर) यांनी 'ज्ञानगंगा घरोघरी', प्रेमा कुलकर्णी (माजलगाव) यांनी 'लखलाभ तुला रे बाळा', प्रा.डाॅ.महेश खरात यांनी 'हे तुजला जमते तरी कसे' आणि अनिता वलांडे (शिरूर अनंतपाळ) यांनी 'ज्योतिबास स्मरूया' या दर्जेदार रचना सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. सूत्रसंचालक एकताचे अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी 'राजकारण' कविता सादर करत महोल बदलून टाकला.

         या संमेलनाचे प्रस्ताविक एकताचे नेवासा तालुका प्रतिनिधी गोरक्षनाथ पवार आणि आभारप्रदर्शन एड.संजय माकोणे (नेवासा) यांनी केले. यावेळी एकताचे पैठण तालुकाध्यक्ष शहादेव सुरासे, लता बडे, प्रा.डाॅ.द्वारका गिते, राजू वाघमारे, भगवान अमलापुरे, गणेश वासवे, गोविंद यादव, राजश्री ढाकणे, रविंद्र काळे, बी.टी.सांगळे, वैभव शिंदे, भारत बिराडे, पल्लवी भोसले, गोविंद मोगले, जयपाल मेकाले यांच्यासह राज्यभरातील अनेक कवी कवयित्रींनी सहभाग घेतला.

No comments