🩻स्वामी सेवा 🩺 अक्कलकोट पदयात्रेकरूंची मोफत वैद्यकीय तपासणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छ...
🩻स्वामी सेवा 🩺
अक्कलकोट पदयात्रेकरूंची मोफत वैद्यकीय तपासणी
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील सर्व स्वामी भक्तांची गुरुवार,दि.5 डिसेंबर रोजी मिरज,ता.मिरज येथे सायं.7.00 ते रात्री 10.00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.आयुष भारत डॉक्टर असोसिएशन व समर्थ हॉस्पिटल,वाघबीळ चे डॉ.संतोष सुतार सर व त्यांची टिम यांनी हा पदयात्रेतील स्वामी भक्तांसाठी सेवाभावी उपक्रम आयोजित केला आहे. डॉ. सुतार सर हे स्वामी भक्त असून पदयात्रेतील भक्तांची सेवा म्हणजेच स्वामींची सेवा हा सेवाभावी भाव मनात बाळगून ते सर्व भक्तांना सेवा पुरविणार आहेत.
या आरोग्य तपासणीमध्ये प्रामुख्याने ते ऑर्थो,स्पाईन व ईतर जनरल तपासण्या करून भक्तांना औषधोपचार करणार आहेत.तरी स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सुतार यांनी केले आहे.
🌴श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌴
No comments