Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

भगवानगड येथे " ग्रामसेवा संदेश " दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न :-

 भगवानगड येथे " ग्रामसेवा संदेश " दिवाळी अंकाचे  प्रकाशन संपन्न :  अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे:-  महाराष्ट्रात नावाजलेला ग...

 भगवानगड येथे " ग्रामसेवा संदेश " दिवाळी अंकाचे  प्रकाशन संपन्न :



 अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे:-  महाराष्ट्रात नावाजलेला ग्रामसेवा संदेश या     दीपावली  विशेषांकाचे प्रकाशन आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगड येथे महंत भगवानबाबा यांच्या गादीशेजारी.  ह.भ. प.  नारायण महाराज शास्त्री ग्रामविकास अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. युवराज पाटील , ग्रामसेवक पतसंस्था अहिल्यानगरचे व्हॉईस चेअरमन  श्री. दिलीपराव नागरगोजे,     संपादक तथा प्रदेशाध्यक्ष  राष्ट्रीय जयंती उत्सव( वंजारी समाज ) श्री. एकनाथराव ढाकणे, उपसंपादक श्री. राजेंद्रजी फंड ,  डॉ अंबादास डोंगरे प्राचार्य समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेवगाव , महारुद्र बडे अध्यक्ष पाथर्डी तालुका ग्रामसेवक संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाले. 

       प्रास्ताविकात संपादक श्री एकनाथराव ढाकणे म्हणाले की गेल्या 21 वर्षापासून  ग्रामसेवा संदेश  दिवाळी अंक प्रकाशित होत असून दरवर्षी फक्त देवादिकांचे मुखपृष्ठ घेवून अंक प्रकाशित होतो. यातील जाहिराती व  साहित्य हे नेहमी उच्च दर्जाचे आहे. ग्रामसेवक व इतर कर्मचारी तसेच मान्यवर लेखक व  नवीन लिहिणाऱ्या साहित्यिकांना हे व्यासपीठ ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.  महाराष्ट्रभरातील साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी यांना या अंकाचे मोफत वाटप केले जाते. आजपर्यंत या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

                      या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर श्री. विठ्ठलाचा व भगवान बाबा यांचे मुखपृष्ठ व साहित्याचा दर्जा पाहून ह . भ. प.  नारायण महाराज शास्त्री  यांनी समाधान व्यक्त केले व शुभेछ्या दिल्या.

                    श्री. युवराज पाटील म्हणाले की ढाकणे साहेब यांनी गेल्या 21 वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा मोडू नये. यामुळे अनेक साहित्यिक उदयास आले आहेत. आज आपण जरी  सेवानिवृत्त झाले असाल तरी  आम्ही सर्व  ग्रामपंचायत अधिकारी तुमच्या पाठीशी राहतील. व ही साहित्यिक  परंपरा चालू ठेवू. 

                उपसंपादक श्री. राजेंद्र फंड म्हणाले की ग्रामसेवा संदेश हा दिवाळी अंक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातील तसेच इतर देशातील  मराठी भाषिक साहित्यिक यांचेपर्यंत हा दिवाळी अंक पोहोचला आहे. त्यांचे ही लिखाण या अंकात आहे. हीच ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाची प्रसिद्धीची पोचपावती आहे.

No comments