चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत माळगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन चोकाक तालुका हातकणंगले येथील अभिजित माळगे हे रिपब्लि...
चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत माळगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन
चोकाक तालुका हातकणंगले येथील अभिजित माळगे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आयटी सेल उपाध्यक्ष व हातकणंगले तालुका महा-ई-सेवा केंद्र संघटनेचे सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी होते त्यांचे हृदयविकाराने हैदराबाद येथे दुःखद निधन झाले अभिजीत माळगे हे हैदराबाद येथे ट्रीप साठी आपल्या कुटुंबाबरोबर गेले होते तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे तेथे निधन झाले ते आपल्या महा सेवा केंद्रातून गोरगरिबांची कामे करून देत असत सामान्य नागरिकांची व गरजू लोकांची कामे विनामूल्य करून देत असत समाजात वावरत असताना त्यांचा स्वभाव मनमिळावू होता प्रत्येकाला आपुलकीने व प्रेमाने बोलत असत त्यांच्या या अगदी कमी वयात अचानक जाण्याने पंचक्रोशीत,समाजात हळहळ व्यक्त होत आहे महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होती त्यांच्या अचानक जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे इतकेच नव्हे तर सांगली जिल्हा, कागल तालुका, पन्हाळा तालुका या ठिकाणी देखील त्त्यांच्या अचानक मृत्यू ने हळ हळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगी एक मुलगा व बहीण असा परिवार आहे त्यांची रक्षा विसर्जन रविवारी दिनांक 17 /11 /2024 इ रोजी चोकाक येथे सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे.
No comments