आमदार राजळे यांच्यावरीलभ्याड हल्ल्याचा चितळीत जाहीर निषेध-बाळासाहेब ताठे अहमदनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवा...
आमदार राजळे यांच्यावरीलभ्याड हल्ल्याचा चितळीत जाहीर निषेध-बाळासाहेब ताठे
अहमदनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी या ठिकाणी आमदार मोनिका राजळे यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा चितळी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला दिनांक २२ रोजी चितळी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गणपती चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी चितळी गावची युवा कार्यकर्ते बाळासाहेब सर ताठे यांनी या घटनेचा जाहीर निषेध करीत या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्याला समाज भविष्यात माफ करणार नाही तसेच प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक गावात प्रचारासाठी जावे लागते याचेभान ठेवली पाहिजे हे गाव गुंड जर वेळीच आवरले नाहीत तर मात्र भविष्यात राजकारणाचे चित्र वेगळेच पाहायला मिळेल व समाज घातक प्रवृत्तीलाआळा घातला पाहिजे यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते राजकारण संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आपण एकत्र राहिले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या व या घटनेचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध केला यावेळी गावचे ज्येष्ठ नेते वृद्धेश्वर चे संचालक सुभाष अण्णा ताठे ग्रामपंचायत सदस्य बाबा आमटे प्राध्यापक अशोक ताठे वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब ताठे ह भ प उद्धव महाराज धमाल ह भ प कृष्णा महाराज ताठे बलभीम ढमाळ मदन मस्के अनिल ढमाळ अशोक ढमाळ बाळासाहेब कोठुळे अरुण ताठे इत्यादी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जेष्ठ नेते सुभाष अण्णा ताठे म्हणाले समाजकारण व राजकारण हे हातात हात घालून चालत असतात तेव्हा समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो परंतु आमदार मोनिकाताई राजळे वरील हल्ला हा एक भ्याड हल्ला होता शिरसाटवाडी या ठिकाणी घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणच्या टुकर प्रवृत्तीने हा हल्ला घडवून आणला त्यामध्ये आमदार मोनिकाताई यांना किरकोळ मार लागला तसेच काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली सात आठ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या त्यांच्यावर दगडाने हल्ला केला लोकशाही असलेल्या देशांमध्ये एका महिले वरती अशा पद्धतीने हल्ला करणे अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध करत आहे असे ते म्हणाले यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य बाबा आमटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व या घटनेच्या जाहीर निषेध व्यक्त केला प्राध्यापक अशोक ताठे उद्धव महाराज ढमाळ कृष्णा महाराज ताठे मदन म्हस्के बाळासाहेब कोठुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व या घटनेच्या जाहीर निषेध केला यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये अजित ताठे चंद्रकांत ताठे सुधाकर घोडके निलेश ताठे विष्णू गरजे प्रमोद वलवे सचिन ढमाळ संतोष कदम अर्जुनामटे सुनील पवार व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते
No comments