Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जय..पराजयाच्या भितीने बाप बदलणारी औलाद नाही ..

 जय..पराजयाच्या भितीने  बाप बदलणारी  औलाद नाही ..                                                              🛑 बॅलेट पेपरच  जनतेला वर्तमा...

 जय..पराजयाच्या भितीने  बाप बदलणारी  औलाद नाही ..                                                              🛑 बॅलेट पेपरच  जनतेला वर्तमान  गुलामीतून मुक्त करेल.

🛑  लुटारुवाद्यांचा कब्जा हटविण्याची  चक्रधर मेश्राम यांची मागणी.        



                               नागपूर / प्रतिनिधी दि. १४/११/२०२४  कायदेमंडळावर मनुवादाचा कब्जा असुन ते जनतेला गुलाम करून घेण्यासाठी आपल्या  विचारांने प्रशासनावर  दबाव  टाकून सर्व क्षेत्रात कब्जा करून जनतेला गुलाम करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. मीडियावर  कब्जा केला आहेच. सर्वांचे मूळ कारण निवडणुकीत ईव्हीएम मधुन होणारी मताची चोरी आहे,

म्हणुन  मनुवादी व्यवस्थेचे अनेक पक्ष, काँग्रेस , बीजेपी आणि ईतर डावे हे बहुसंख्य होतात . म्हणून 

ईव्हीएम हटाव देश बचाओ.. हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मी जिंकलो तरी बाबासाहेब आंबेडकर.. आणि हरलो तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि समग्र  महाराष्ट्रातील महापुरुषांच्या, समाजसुधारक ,समाजसेवक  यांच्या विचारांनीच चालणार. जय पराजयाच्या भीतीने   बाप बदलणारी औलाद आमची नाही. असे मत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी ऊस चिन्ह घेऊन खंबीर नेतृत्वाने लढणारे उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले.

येणाऱ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगेन, मी कुठल्या राजकीय पक्षाची चाटुगिरी करत बसलो नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या  विचारांनीच चालत आलो. नेहमी या विचारांशी एकनिष्ठ राहीन. आणि सदैव शेतकरी, कामगार , महीलांना हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी अत्याचारांच्या विरोधात संघर्ष  करित लढत राहुन  सर्व जनतेला संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करित राहाणार असल्याचे प्रतिपादन चक्रधर मेश्राम यांनी केले. महाराष्ट्रीयन  माता भगिनी, अन्नदाता मायबाप, तरुण युवा मतदारांनी 20 नोव्हेंबरला  ऊस शेतकरी या चिन्हावर बटन दाबून मतदान करावे, हे लक्षात ठेवावे असे आवर्जून सांगितले.

 चक्रधर मेश्राम पुढे म्हणाले की, लोकशाही केवळ निवडणुकी पुरतीच नाही तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया आहे  ती वाचली पाहिजे आणि जे  लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी प्रयत्न करणार अशाच उमेदवारांची निवड केली पाहिजे असे आवाहनही जनतेला केले.

लाडक्या बहिणीनो ! आणि मातांनो पंधराशे रुपयाच्या आमिषाला बळी पड नका .  ही तुमच्या प्राणाची किंमत नाही. कारण आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा हा आमचा मताचा अधिकार आहे.   ते पैसे जर लाडक्या भावाने म्हणजे अर्थमंत्री अजित पवार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनीच निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील आर्थिक संपतीच्या आकड्यातून जर दिली असती, तर लाडका भाऊ खरोखर ठरला असता.

   परंतू  बहिणी  न  मागताच आमच्या नावावर 46000 कोटी रुपयाचे भांडवली बाजारातून ( 100/- रुपयाचा मुद्रांक 500/- रुपये केला. शिवाय 100/- सोयाबीन तेल बॅग 135/- वर नेली, इतर वस्तुवर ड्युटी 20% वाढवली ) उभे करुन महागाई वाढवली. आणि वर्षभर योजनेसाठी 46000 कोटी रुपये उभे केले. त्यापैकी 5 महिन्याचे 21000 कोटी वाटले, उर्वरित 25000 कोटी रुपये निवडणुकीत वापरण्यास हे महाराष्ट्रातील सत्ताधारी चोर मोकळे झालेले आहेत. जरी भाजपचे, महायुतीचे सरकार आले,  मुख्यमंत्री  हे फडणवीस, शिंदे, अजित पवार किंवा आणखी कुणीही जरी झाले. तरी लाडकी बहीण कडकी झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला  जनतेला सांगण्याची गरज का पडते,? कारण तुम्ही फार भावनिक होऊन मतदान करता म्हणून सांगणे आवश्यक वाटत आहे.

चक्रधर मेश्राम यांनी आवर्जून सांगितले की, आमच्या महाराष्ट्रीयन माता भगिनींना, मुलींना सुरक्षा आवश्यक आहे, शिक्षण आवश्यक आहे, उच्चं शिक्षण आवश्यक आहे, महिलांना 33% आरक्षणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे, खाजगी , सार्वजनिक ठिकाणी नोकरीं करत असतांना तेथे सुरक्षेची हमी पाहिजे, रात्रीच्या वेळी कामावरून एकटी येता जातांना सुरक्षेची हमी पाहिजे, निर्भया सारखी प्रकरणे, बदलापूर सारखी प्रकरणे कधीही घडू देणार नाही, याची हमी पाहिजे, स्वाभिमानाने समाजात ताठ मानेने जगण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. केवळ पंधराशे रुपयात सर्व हमीची किंमत ठरवणार आहात का.....?

जेंव्हा  घरात अनेक पाहुणे येतात, त्यांना पाहुणचार करुन पोटभर पहिल्यांदा जेऊ घालून उरो किंवा न उरो याचा विचार न करता पाहुण्यांची बरोबरी करता. असा त्याग तुम्ही जीवनभर करत आला आहात. त्या त्यागाची परतफेड तर आम्ही पुरुषमंडळी कधीही करूच शकत नाही. परंतू  , हाच त्याग इथेही दाखवा की 1500/- रुपयात आपले मोलाचे मत भावनेच्या आहारी जाऊन मातीमोल करू नका..कारण तुम्हीच साऱ्या विश्वाला जन्माला घातलेलं आहे. तुम्हीच जगाची माता आहात. तुमच्याच हातात सर्वकाही आहे. कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे, की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल......जर कदाचित कडेलोट झालाच तरी आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून  टाकून आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेऊ..

      कारण हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्यासाठी आहे..... 

     तेंव्हा ही जबाबदारी माझीच असून मीच त्याला जबाबदार आहे. म्हणूनच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकन महिलांच्याही अगोदर आपणाला सन्मानाने मताचा अधिकार दिलेला असतांना आपण पंधराशे - रुपयात  मत कसे काय विकेन यांचा विचार केला पाहिजे.

    असा निर्धार करुनच मतदान करा....आमच्या कडे येऊ नका,

आमची भेटही घेऊ नका

रॅलीही काढु नका, सभाही घेऊ नका,

पत्रके छापु नका,

आम्हाला चहा सुध्दा पाजू नका,

बॅनर बाजी करू नका

रिक्षा,गाड्या लावू नका,

भोंगे लावून साऊंड प्रदुषण करू नका!

तरीही आम्ही चक्रधर मेश्राम यांच्या "ऊस शेतकरी या चुनाव चिन्हावरचे बटन दाबून मतदान करणार आहोत!

असे मला  ब्रम्हपुरी सिंदेवाही आणि सावली तालुक्यातील, शहरातील खेड्यापाड्यातील हजारो मतदारांनी  सांगितले आहे त्या बद्दल चक्रधर मेश्राम यांनी मतदारांचे आभार मानले .. 🍀

No comments