शेतकरी (ऊस) उमेदवाराचे नाव कमळ आणि पंजापेक्षाही भारी.?? 🔹महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी केलं तरी काय ? ...
शेतकरी (ऊस) उमेदवाराचे नाव कमळ आणि पंजापेक्षाही भारी.??
🔹महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी केलं तरी काय ?
🔹 मतदारांच्या मुखात शेतकरी नांव, तिथं असेल आपलं गाव .
ब्रम्हपुरी प्रतिनिधी दि.१२/११/२०२४:- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते. अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी (ऊस) या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडुन देण्यासाठी मतदार खंबीर असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना शेवटच्या क्षणापर्यंत चांगलीच कसरत करावी लागणार आहे. आता SC/ST ओबीसी , बहुजन समाजाने आपले डोळे पूर्णपणे उघडे ठेऊन मतदान करावे . मतदारसंघात विविध विकास कामे नियोजन कामे करण्यासाठी उमेदवारांचे ध्येय किती मजबूत आहे. सुज्ञ नागरिकांना आता हीच योग्य उमेदवार निवडून देण्याची खरी वेळ आहे.
आता मतदारांनी योग्य मोट बांधली नाही तर मनूवादी विचारसरणीचे नेते महाराष्ट्रातील जनतेला गुलाम करून घेण्यासाठी कायमची मोट बांधतील यांत शंका नाहीं. तेंव्हा जनतेने शेवटची निवडणूक आहे असं समजावे. मनुवादी व्यवस्थेच्या हातात सत्ता गेली तर नंतर निवडणुका होतीलच असे नाही.
काय करायचं ते आताच करावे. नाहीतर मनुवादी व्यवस्थेचे बळी व्हावे लागेल. पुढे फक्त आणि फक्त शेतकरी विकासाचा आमदार पाहिजे . त्यासाठी बहुजन समाजाने एकत्र यावे. संघटित व्हावे.. समाजाला , राष्ट्रीय संपत्ती विकली जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि वाचवावी. बहुजन समाजाने राष्ट्र वाचविण्यासाठी शेतकरी यांना निवडून द्यावे. आता नाही हटणार मागे, वादळ उठणार आता शेतकऱ्यांचा,
निवडून येणार.... येणार, जिंकून येणार शेतकरी आता .
ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीसाठी (ऊस) शेतकरी हे धडाकेबाज बोधचिन्ह मतदारसंघात प्रसिद्ध झाले आहे .
महायुतीची आणि महाराष्ट्रातील महाआघाडीच्या नेत्यांची युती ही अदानी, अंबानी च्या विकासासाठी बनलेली आहे.
आणि शेतकरी हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करित आहेत.
महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे त्यांना काय हवे आहे??. अदानी-अंबानी, गुजरातचा विकास की महाराष्ट्राचा, महाराष्ट्रीयन लोकांचा विकास??
ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी आहे म्हणून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेतकरी उमेदवारांनाच निवडून द्या. असे मत हजारो सुज्ञ नागरिक , भगीनी युवक युवतींनी व्यक्त केले आहे.
हर गली गाओ, शहर और गाॅंव में होगा शेतकरी (ऊस) चक्रधर मेश्राम का नाम, ...
ना बोतल , ना नोट
फ्री में मीलेंगा शेतकरी को वोट. अशा चर्चा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्यासाठी आणि समस्त शेतकरी, बहुजनांच्या भवितव्यासाठी शेतकरी ऊस या बोधचिन्हावर मतदान करुन चक्रधर मेश्राम यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे असा सुरही ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे.
No comments