राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबईच्या नेतृत्व फेरनिवडीचे कोल्हापुरात दिमाखदार स्वागत मा.सखाराम भणगे यांना निवडपत्र देताना मा.सचिन अहिर व मा.गोव...
राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबईच्या नेतृत्व फेरनिवडीचे कोल्हापुरात दिमाखदार स्वागत
![]() |
मा.सखाराम भणगे यांना निवडपत्र देताना मा.सचिन अहिर व मा.गोविंदराव मोहिते |
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
कोल्हापूर दि.२५: राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबईची निवडणूक दिनांक 21ऑक्टोबर 2024रोजी मुंबई येथे पार पडली.या निवडणुकीत राष्ट्रीय मिल मजदूरी संघाच्या अध्यक्षपदी सचिनभाऊ अहिर, तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांच्या फेर निवडीचे कोल्हापूरातील गिरणी कामगारांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्ती देसाई यांची खजिनदारपदी, बजरंग चव्हाण यांची उपाध्यक्षपदी,सखाराम भनगे,मनोहर पाटील आणि बबन आसवले यांची संघटन सेक्रेटरीपदी फेरनिवड झाली आहे.या सर्वच कोल्हापूरच्या सुपूत्रांनी अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या अनेक लढ्यात भाग घेऊन, कोल्हापूर शहराचे नाव उज्वल केले आहे,त्या बद्दल कागल,महागाव,राधानगरी आणि शाहूवाडीच्या ग्रामस्थांनी संघटनेच्या नेतृत्वाचे तसेच कोल्हापूरच्या सुपूत्रांचे अभिनंदन केले आहे.
आज अस्तित्वात असलेल्या मुंबईतील ५ गिरण्यातील कामगा रांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या प्रतिनिधीं आणि स्विकृत सदस्यांची २१ ऑक्टोबर रोजी परेलच्या मनोहर फाळके सभागृहात सभा पार पडली.या संयुक्त प्रतिनिधी मंडळाच्या सभेत अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची अभिनंदनीय फेर निवड झाली.सभेने संघटनेचे अन्य पदाधिकारी निवडण्याचे अधिकार अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना दिले होते.त्याप्रमाणे निष्ठावंत आणि सक्रिय पदिधिकारी म्हणून वरील सर्व कोल्हापूर सुपूत्रांची पुढील पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. श्री.सखाराम भणगे यांची संघटन सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाहुवाडी तालुक्यातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच सखाराम भणगे यांच्या नेर्ले गावातील कोल्हापूर शेतकरी संघाचे संचालक सुभाष जामदार,प्रा.रंगराव उर्फ आबा पाटील, शिवाजी पाटील,अशोक जामदार,आनंदा जामदार,उमेश पाटील, दिलीप गवळी, महिपती दिंडे,सचिन पाटील, उद्योजक आण्णा डांगे, जगन्नाथ डांगे व सर्व नेर्लेकर ग्रामस्थांनी या निवडीबद्दल सखाराम भणगे यांचे अभिनंदन केले आहे.
No comments