कोल्हापूर: प्रतिनिधि श्री.शिवाजी विठ्ठल चौगुले. रेल्वे कर्मचारी बेताल... प्रवाश्यांचे हाल....!! मुंबई व उपनगरातील मध्य रेल्वेचा लोकल प्...
कोल्हापूर: प्रतिनिधि
श्री.शिवाजी विठ्ठल चौगुले.
रेल्वे कर्मचारी बेताल...
प्रवाश्यांचे हाल....!!
मुंबई व उपनगरातील मध्य रेल्वेचा लोकल प्रवासी खुपच हैराण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन लोकल वेळेवर येत नाहीत, 10 मिनीटे ऊशिरा भारतीय नागरीक सहन करू शकतो पण अर्ध्यातासाच्या वर पैसे व वेळ वाया घालवुन कोण सहन करेल. रेल्वे प्रशासन तर फक्त तिकीटाचे आणि पासाचे पैसे मोजत आहे.
अंबरनाथ लोकलने तर हद्दच पार केली आहे, सकाळी 08.10 सीएसटीसाठी वाजता सुटणारी लोकल रोजच ऊशिराने सुटत आहे, बदलापुरवरून 08.10 ला सुटलेली लोकल अंबरनाथला 08.22 वाजता येते ती अंबरनाथ वरून 08.10 सुटणा-या लोकलच्या पुढे जाते, असे होणे म्हणजे रेल्वे प्रशासनाचा गलथानपणा आहे. सिग्नल यंत्रणा सांभाळणारे अधिकारी /कर्मचारी यांस जास्त जबाबदार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (cst) ला जाणाऱ्या बदलापुर / अंबरनाथवरून सुटलेल्या गाड्या कल्याणला 15 ते 20 मिनीटे थांबवल्या जातात , मग सर्व वेळापत्रक कोलमडते, सर्व रेल्वे प्रवाश्यांना वाटते की , रेल्वे प्रशासनाने लोकल वेळापत्रक केवळ प्रवाशांची खिल्ली उडविण्यासाठी तयार केलेले आहे, पण एक दिवस प्रवासी जागा झाला तर, रेल्वे प्रशासनाला दरमहा मिळणारे वेतनही मिळणार नाही.
संध्याकाळची गत तिच आहे , रोज म.रे. तिला कोण रडे अशी व्यवस्था झालेली आहे.लोकल इंडीकेटर सुध्दा ब-याच वेळा विचित्र लावले जातात, लोकलमध्ये तर उलट दिशेने जाणा-या वेळापत्रकानुसार यांत्रीक उच्चारण होते, एकदा तर अंबरनाथवरून सकाळी 08.27 सीएसटीसाठी सुटणा-या लोकलला तिन लेडीज डबे जास्त होते, अंबरनाथ प्रवाश्यांना सुचेना की काय करावे ,काही उतरले काही उतरून परत चढले. प्रवाश्यांचे किती हाल करायचे यालाही काही मर्यादा आहे , रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की , प्रवाश्यांचा अंत पाहु नका... ! श्रीमंताची किव येणा-या बिनडोक डोक्यातून ए.सी. लोकल चालू झाली आणि त्या दिवसापासुन गरिबांचे हाल झाले , त्यात अजून दि.05/10/24 पासून वेळापत्रक बदलले आणि प्रवाश्यांची गळचेपीच झाली आहे , रोजच प्रवाशी घायाळ होत आहेत काही मृत्युमुखी पडत आहेत. पण रेल्वे प्रशासनाला आजिबात देणे घेणे नाही. मुंबई बाहेर सुटणा-या गाड्यांना प्राधान्य दिले जाते पण या जड डोक्याच्या प्रशासनाला कळत नाही की ,बाहेर जाणा-या प्रवाशांपेक्षा लोकलने प्रवास करणारे प्रवासी 80 लाख आहेत. मेल गाडी पुढे वेळ कव्हर करू शकते पण लोकल वेळ कव्हर करू शकत नाही.
रेल्वे प्रशासनास प्रवासाची झळ/त्रास काय असतो , नोकरीला/ व्यवसायास/ ऊशिरा पोहोचल्याने प्रवाश्यांचे करोडो रूपयांचे नुकसान होत आहे , अनेक प्रवासी आजारी /अपंग असतात त्यांचे हाल होत आहे. गर्दीमुळे महिलांचा विनयभंग होत आहे सदर गुन्हे कोणाविरूध्द नोंदवावेत, याची दखल मा. महिला आयोग , मा. मानवी हक्क आयोग घेईल का...?महाराष्ट्रातील लाडका भाऊ अंबरनाथ,कल्याण,बदलापुरच्या प्रवाशी लाडक्या बहिण/भावांचा हा प्रश्न सोडवेल का..?
No comments