Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मुंबईत हक्काच्या घरांसाठी शाहूवाडी व ३२ शिराळा तालुक्यातील गिरणी कामगारांचा एल्गार

 *मुंबईत हक्काच्या घरांसाठी शाहूवाडी व ३२ शिराळा तालुक्यातील गिरणी कामगारांचा एल्गार!* कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार ​८ मार्च रोजी नेर्ले...

 *मुंबईत हक्काच्या घरांसाठी शाहूवाडी व ३२ शिराळा तालुक्यातील गिरणी कामगारांचा एल्गार!*


कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार


​८ मार्च रोजी नेर्ले येथे जाहीर सभेचे आयोजन; राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे दिग्गज करणार मार्गदर्शन


मुंबईतील गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नेर्ले (वारणा), ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी ही सभा पार पडणार असून, यामध्ये शाहूवाडी आणि ३२ शिराळा तालुक्यातील हजारो गिरणी कामगार सहभागी होणार आहेत.

       मुंबईच्या उभारणीत रक्ताचे पाणी करणाऱ्या गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत, ही या सभेची प्रमुख मागणी आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये:अध्यक्ष  सचिन भाऊ अहिर विधानपरिषद आमदार आणि गोविंदराव मोहिते सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली व कृती संघटना यांचा वतीने ​निवृत्ती देसाई (खजिनदार, राष्ट्रीय मिल मजदूर संघ)बजरंग चव्हाण (उपाध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ)

​मनोहर पाटील (संघटक सचिव)

​ सखाराम भणगे

​हे सर्व नेते कामगारांना सध्याची परिस्थिती, शासनाचे धोरण आणि भविष्यातील संघर्षाची दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

      शाहूवाडी आणि शिराळा हे दोन्ही तालुके गिरणी कामगारांचे बालेकिल्ले मानले जातात. अनेक वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी आपली ताकद दाखवण्यासाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

​गेल्या काही वर्षांपासून घरांच्या सोडतीतील विलंब आणि वाढत्या किमती यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही 'नेर्ले' येथील सभा अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

No comments