Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

गणेश मंडळांनी नियमावलीचे पालन करावे

 गणेश मंडळांनी नियमावलीचे पालन करावे (नूतन डीवायएसपी राजश्री पाटील यांचे आवाहन) उंब्रज/प्रतिनिधी उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनच्या हद्दी...

 गणेश मंडळांनी नियमावलीचे पालन करावे



(नूतन डीवायएसपी राजश्री पाटील यांचे आवाहन)


उंब्रज/प्रतिनिधी


उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाची बैठक मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी येथील अरण्या मंगल कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला कराडच्या नूतन डीवायएसपी राजश्री पाटील यांनी उपस्थित राहून गणेश मंडळांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन करताना गणेश मंडळांनी नियमावलीचे पालन करावे असे आवाहन केले. या बैठकीला विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच, विविध पदाधिकारी उपस्थित होते.कराडचे नायब तहसीलदार राठोड,उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे,पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डीवायएसपी राजश्री पाटील म्हणाल्या की, कोणत्या मंडळांकडे परवानगी आहे किंवा कोणत्या मंडळांकडे परवानगी नाही याची खातरजमा पोलीस पाटील करतील.आपल्या गावातील मंडळांच्या प्रमुखांच्या, सभासदांच्या संपर्क क्रमांकांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. कारण उद्या जर एखादा अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी निश्चित करताना ती यादी कामाला येईल.मंडळाचे मंडप  रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने कुठेही रस्त्यात येता कामा नयेत.गणेश मंडळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून कोणी मूर्तीची विटंबना केली तर ती व्यक्ती आपणास पटकन शोधता येईल. इच्छेनुसार वर्गणी गोळा करा. वर्गणी गोळा करताना सक्ती करणे,धमकावणे असा प्रकार आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाईल. मिरवणूक शांततेत पार पडावी.आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास मंडळावरती गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस प्रशासन व गणेश मंडळांमध्ये समन्वयाने मार्ग काढून शांततेत गणेशोत्सव पार पाडावा अशी अपेक्षा डीवायएसपी राजश्री पाटील यांनी व्यक्त केली.


चौकट 


बैठकीतले ठळक मुद्दे 


वर्गणी बाबत सक्ती केल्यास तसेच आवाजाची मर्यादा ओलांडल्यास गुन्हा दाखल. सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश.मंडळांच्या परवानग्याबाबत खातरजमा करण्यासोबतच मंडळ प्रमुखांच्या नाव,संपर्क क्रमांकाची यादी पोलीस पाटलांनी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

No comments