*चिजदऱ्याच्या विहिरीत सापडलेली दुचाकी नेमकी कुणाची?* (तत्कालीन सपोनि अजय गोरड यांच्या कार्यकाळातील घटना) रघुनाथ थोरात मौजे मांगवाडी,ता.करा...
*चिजदऱ्याच्या विहिरीत सापडलेली दुचाकी नेमकी कुणाची?*
(तत्कालीन सपोनि अजय गोरड यांच्या कार्यकाळातील घटना)
रघुनाथ थोरात
मौजे मांगवाडी,ता.कराड गावच्या हद्दीत पश्चिमेकडील डोंगर पायथ्याला असलेल्या गट क्रमांक १९ मधील चिजदरा नावाच्या शेतशिवारात ओढ्यालगत असलेल्या म्हसोबा मंदिरा शेजारील शेतात काढलेल्या सिंचन विहिरीमध्ये अज्ञातांनी दुचाकी टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, याबाबतची माहिती उंब्रज पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना समजताच त्यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून खातरजमा करून सदर घटनेमध्ये योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उंब्रज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत विहिरीमध्ये बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या दुचाकीचा सांगाडा विहिरी बाहेर काढून जप्त करीत योग्य ते कागदोपत्री सोपस्कार पार पाडले होते.तसेच सदर बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या दुचाकी संदर्भात विविध शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने तपास देखील सुरू केला होता. परंतु, काही महिन्यांनी तत्कालीन सपोनि अजय गोरड यांची कराडला बदली झाल्यामुळे सदर दुचाकीबाबतच्या पुढील तपासात पुढील प्रगतीची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे विहिरीत सापडलेली ती दुचाकी नेमकी कुणाची होती? हे रहस्य अद्याप अनुत्तरितच आहे.
No comments