देविदास शर्मा यांना भारत गौरव संम्मांन पुरस्कार प्रदान *भारत गौरव पुरस्कार मिळणे माझ्या साठी व जिल्ह्यासाठी खूप मोठा गौरव --- देविदास शर्मा...
देविदास शर्मा यांना भारत गौरव संम्मांन पुरस्कार प्रदान
*भारत गौरव पुरस्कार मिळणे माझ्या साठी व जिल्ह्यासाठी खूप मोठा गौरव --- देविदास शर्मा*
शांताई फाऊंडेशन.हिरकणी विकास संस्था.विसावा फाऊंडेशन संचालित पुणे द्वारा
आयोजित ' रंग श्रावणाचा गौरव समाज सेवेचा विलोभनीय *भारत गौरव संम्मांन सोहळा 2025 पुरस्कार साठी खामगाव येथील सतिफैल भागातील *देविदास शर्मा* यांची निवड करण्यात आली होती *सामाजिक* क्षेत्रातील निस्वार्थ उल्लेखनीय कार्याचा ठसा प्रभावीपणे लक्षात आला या कार्यासाठी देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.शांताई फाऊंडेशन.हिरकणी विकास संस्था.व विसावा फाऊंडेशन पुणे व्दारा आयोजित सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरवार्थ सत्कार करण्यासाठी *भारत गौरव संम्मांन पुरस्कार सोहळ्या* चे आयोजन करण्यात येते भारत गौरव सम्मान हा भारतातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना दिला जातो हा पुरस्कार व्यक्तीच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करतो आणि त्यांना समाजा साठी अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो पुरस्कारा साठी निवड करताना व्यक्तीच्या कार्याचे समाजावर होणारे परिणाम आणि इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता विचारात घेतली जाते व
सन्मानित करण्यात येते. यामध्ये भारत गौरव संम्मांन पुरस्कार 2025 साठी खामगाव येथील सतिफैल भागातील सामाजिक धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे
श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे सेवा भावी कार्य पाहून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष *देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांना भारत गौरव सर्वोच्च संम्मांन पुरस्कार दिं 27 जुलै 2025 रविवार रोजी अभिनेते तेजसजी बर्वे. आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते व
मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य दिव्य सम्मान सोहळ्यात पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक गौरव नव्हे तर सतिफैल.खामगाव तालुक्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी खुप मोठा गौरव आहे
मागील 25 वर्षापासून श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या कार्याचा केंद्र बिंदू नेहमी मानव सेवा सामाजिक क्षेत्रात गरीबांसाठी अन्नदान ब्लॅकेट वाटप पक्ष्यां साठी पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्ष भर श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ निस्वार्थ पणे राबवित असते .हिंदू धर्म एकत्रिकरणासाठी अनेक ठिकाणी सामुहिक जप. पारायण.व भजनाचे आयोजन असे अनेक उपक्रम राबविले जातात भजनी मंडळाच्या सेवा भावी समर्पित कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याप्रसंगी संत ज्ञानेश्वराची मुक्ताई अभिनेते तेजसजी बर्वे. सोलापूर चे आमदार देवेंद्रदादा कोठे. दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश दिंडले. स्टार प्रवाह अभिनेते दिलीप घैवंदे. मा अभिजित करपे. प्रा डॉ संचालक समृद्धी प्रकाशन बी एन खरात. शांताई फाऊंडेशन अध्यक्ष लक्ष्मी चव्हाण. विसावा फाऊंडेशन अध्यक्षा स्वाती तरडे. हिरकणी महिला विकास संस्था अध्यक्षा शर्मिला नलावडे. सेवा निवृत्त p s I शेषरावजी अंभोरे. ओमप्रकाश विश्वकर्मा. राजकमल यादव. अरूण कडवकर. दिलीप झापर्डे. गजानन मनाळ. राजकुमार शर्मा . वंदना मनाळ. शे आतिक उपस्थित होते या नंतर मनाळ परिवार चे वतीने सुध्दा देविदास शर्मा यांचा शाल. पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या आधी देविदास शर्मा यांना या आधी इंडियन एक्सलन्स अवार्ड. राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य भुषण पुरस्कार. महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार मिळाले आहे
मा संपादक साहेब
दै
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी देण्यात यावी ही नम्र विनंती
No comments