प्रतिंभावंत लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्वाभिमानी नायक आणि नायिका. जोशीलाताई लोमटे (सकल मातंग समाज समन्वयक) समता आणि बंधुत्व य...
प्रतिंभावंत लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्वाभिमानी नायक आणि नायिका.
जोशीलाताई लोमटे (सकल मातंग समाज समन्वयक)
समता आणि बंधुत्व या तत्वावर सामाजिक न्यायाची भुमिका घेत लेखन आणि शाहीरी करणारे तुकाराम उर्फ भाऊराव अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्य विश्वाला वेगळेच वलय निर्माण झाले.
कथा ,कांदबरी मधुन क्रांतीकारी आणि अन्याय विरूद्ध बंड करणारे व शीलवान नायक आणि नायिका समोर आले.
महाराष्ट्र भुमीचे वर्णन करणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणतात ही भूमी संताची आहे ,मंहतांची आहे ,नर रत्नाची आहे .आपल्या लेखणीच्या माध्यमातून विद्रोही भूमिका मांडणारे लेखक , अंधश्रद्धेला फाटा देत नीतिमत्ता, विज्ञाननिष्ठा शिकवणारे एक विचारवंत म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभी राहते. लेखणीची ताकद फार मोठी असते याचा पुरेपूर अनुभव अण्णाभाऊ साठे यांचे समग्र साहित्य वाचताना येतो. समाजात असलेल्या दैववाद , गुलामगिरी स्त्री-पुरुष विषमता गुंडगिरी भोंदू शाही सावकारशाही बुरसटलेल्या परंपरेचा विरोध करताना अण्णाभाऊ साठे यांनी कायमपणे स्वाभिमान ,स्वालंबन, उच्च नीतिमत्ता, सर्व धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, मानवता न्याय ,संघटन अशा मानवी मूल्यांना आपल्या प्रत्येक साहित्यकृती मधये अण्णाभाऊ साठे यांनी जपले आहे. त्यामुळे हजारो तरूणांच्या मनामनात प्रबोधनाचा जागर झाला हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वेगळेपण आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अनुभवसिद्ध लेखक होते त्यांच्या साहित्याने समाजातील दुर्लक्षित अशा हाडामासाच्या गोळ्यांना आकार-उकार प्राप्त झाला मुकयांना वाचा , आंधळ्यांना दृष्टी देणारे अण्णाभाऊ ख-या अर्थाने समाज सुधारणेला गती देणारे विचारवंत ठरले.
तत्कालीन साहित्यातील पारंपरिक संस्कृती त्यांनी मोडीत काढली सुटाबुटातील, पांढरपेशी शुद्ध बोलणारा, विलासी नायक-नायिका बाजूला सारले आणि कष्टकरी कामगार वंचित ,उपेक्षित दलित,भटक्या जाती जमाती आणि वेशीबाहेरील लोकांच्या जगण्याचे,साधन नायक नाईकांच्या जगणे अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मांडले त्यामुळे शहरी व मध्यमवर्गीय समूहांना अशा वास्तव सत्याचा पहिल्यांदाच परिचय झाला.
कोणत्याही प्रकारचे शोषण हा गुलामगिरीचा भाग असतो भारतीय समाज रचनेत जातीच्या आधारे, वर्णाच्या आधारे, वलिंगभेदाचा आधारे, धर्माच्या, देवाच्या ,भोंदू बाबाच्या नावाने सातत्याने शोषण होते ही परिस्थिती नेमकेपणाने अण्णाभाऊ साठे यांनी मांडली दारिद्र्यात पिचलेल्या व शोषणाच्या शिकार झालेल्या अनेक नायक-नायिका अण्णाभाऊ साठे यांनी रेखाटल्या.उदा. कोंबडीचोर कथेतील रामू म्हणतो
मला घर नाही ,शेत नाही
अन्न पुढे आणि मी त्याच्या मागे धावतो आहे .
"मी चोरी करू नको तर काय करू तुमचे सरकार चोरी केली म्हणून मला तुरुंगात टाकते ,व सोडून देते पण मला चोरी का करावी लागते याचा कधी विचारच करत नाही." म्हणजे चोर चोरी करतो पण त्याला चोरी करायला भाग पाडणारी ही समाज व्यवस्था वर्ग वाद कोणीच समजुन घेत नाही .
हे वास्तव अण्णा भाऊ आपल्या कथा मधुन सांगतात.
कोणतेही साहित्य हे समाजाला दिशा देणारे असले पाहिजे गलिच्छ मुल्यांना फाटा देणारे साहित्य हे जनताभिमुख असू शकत नाही. आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर चांगले आदर्श घेऊन गेले पाहिजे याचे भान आणि जाण अण्णाभाऊंना होती म्हणुनच त्यांनी बंडखोर नायक उभे केले त्यांना न्यायाची चाड आहे अन्यायाची चीड आहे. गरिबी, दारिद्र्य, अज्ञान, उपासमार यांनी कितीही खंगले असली तरी अण्णाभाऊची नायिका स्वाभिमानी आहे .शीलवान आणि धाडसी कणखर आहे कुणाकडे विकणारी, कुणापुढे झुकणारी नाहीतर शील सांभाळणारी आहे याचे दर्शन त्यांच्या सर्वच कथा कादंबर्यांतून येथे. चित्रा या कादंबरीमधअण्णाभाऊ म्हणतात डोहातील पाणी आटून जाताच माशांची तगमग होऊन ते तळ सोडून तरंगू लागताच कावळे त्यांना वेचून खातात त्याचप्रमाणे खेड्यावर उपासमारीने असलेल्या शेतकऱ्यांच्या मुली जेव्हा व्यापारी त्यांना फसवून मुंबईत आणून विकून स्वतःची पोटे जाळतात असे माणूसरुपी कावळे मी पाहिले आणि म्हणूनच चित्रा कांदबरी लिहले आहे.त्या गलिच्छ वातावरण राहत असताना चित्रा आणि तिच्या बहिणीने आपले इज्जत सांभाळणाताने सोसले हाल हे काळजाला भिडणारे आहे.शिलवान आणि स्वाभिमानी महिला कुठेही राहिले तरी आपल्या चारित्र्याला किती जपते यांचे वर्णन अण्णा भाऊ चित्रा कांदबरी मध्ये लिहले आहे हे वाचक महिला वर्गात स्वाभिमान आणि सन्मान निर्माण करते.
तसेच वैजयंता कांदबरी मध्ये तमाशात नाचगाणे करणारे महिला आपले मुलगी तमाशा पासून दूर राहिले पाहिजे आणि तिने शिक्षण घेऊन डिग्री घेतली पाहिजे.
मायात घंगुरू न बांधु देता हातात शिक्षण साठि पाटि पेन्सिल देणारि आदर्श आई तमाशा मध्ये सुद्धा असतात हे समाजाला अण्णा भाऊंची वैजयंता कांदबरी वाचताना लक्षात येते.आणि शिक्षणाचे महत्व समजते.
अण्णाभाऊ साठे हे जीवनाच्या शाळेतील खरे अनुभवी पदवीधर होते डॉक्टरेट होते कारण शिक्षण म्हणजे केवळ पदव्यांचे भेंडोळे नाही शिक्षणाने शहाणपणा मिळत नाही त्याची सत्यता अण्णाभाऊंच्या लेखणीतून मिळते.सावलीसारखे दैन्य सोबत असतानाही त्यांनी कधी देवाधर्माचा, भुताखेताचा, अंधश्रध्देचा प्रसार आपल्या साहित्यातून केला नाही तर विज्ञाननिष्ठ मूल्यांचे संवर्धन आणि समर्थन आण्णाभाऊंनी सातत्याने केलेले दिसते म्हणूनच भारतीय समाज रचनेत देवाच्या ,धर्माच्या, आधारावर दलीत स्त्रियांचे लैंगिक शोषण करण्याची परंपरा आणि अंधश्रद्धा म्हणून निमूटपणे ती सहन करावी लागणारी पूर्वपरंपरा कशी होती हे धार्मिक प्रतीके व दुष्परिणाम, स्त्रियांचे केले जाणारे शोषण या मुलभूत समस्यांना अण्णाभाऊ साठे यांनी हात घातला आणि चिखलातील कमळ ही कादंबरी लिहिली.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातील माणसं ही कधीतरी, कुठेतरी, पाहिलेली अनुभवलेली होती त्याबाबत आण्णाभाऊ साठे म्हणतात की मला कल्पनेची भरारी मारता येत नाही ही माझी माणसं आहेत ही माणसं अर्थात आताच्या भाषेत सांगायचे तर आम आदमी आहेत ज्यांचे अजून मूलभूत प्रश्नही मिटलेले नाहीत, त्यांच्या घराचा पत्ता नाही,ज्यांची हातातोंडाशी जुळवाजुळव करण्यातच जिंदगी बरबाद होते अशा कुठेतरी गावाच्या एका कोपऱ्यात किंवा शहरातील बकाल वसतीत असलेली त्यांची वस्ती आणि त्यातील माणूस पाहून वअन्यायाची परिसीमा पाहून आणि त्यांचं जगणं पाहिल्यानंतर अशांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मांडणारे मराठी साहित्यातील एकमेव लेखक ठरतात.
समाजातील भटक्या समूहांच्या जगण्याकडे अणा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात विशेष लक्ष दिलेले दिसून येते.
अण्णाभाऊ साठे मातंग जातीत जन्माला आले असले तरी मातंग जातीतील नायक त्यांनी तुरळक प्रमाणातच निर्माण केले आहे जातीपातीचा कोरडा अभिमान त्यांनी कधी आळविला नाही तर कम्युनिस्ट विचार प्रवाहात सुरुवातीच्या काळात वावरत होते. म्हणूनशोषित ही एकच जात त्यांना समजली होती जे जे या व्यवस्थेच्या जात्यात भरडले जात आहे त्या सार्यांना मानवतेचे अधिकार मिळाले पाहिजेत, समाजवादी समाज उभा राहावा हीच त्यांची आंतरिक तळमळ होती म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सर्व बहुजन समाज एकत्र आला पाहिजे अशी मागणी करतात त्याचबरोबर तशी शिकवण साहित्यातून देतात जोवर वर्ग आहेत, जोपर्यंत जाती आहेत,विषमता आहे तोपर्यंत कोणताही समाज संघटित होऊ शकत नाही म्हणून आवडी ही कादंबरी महत्वाची आहे त्यात वरीष्ठ जातीच्या आवडी चौगुलेआणि खालच्या
जातीतील धनाजी रामोशी यांच्या प्रेमाची, आंतरजातीय विवाहाची ही कथा आहे.अशाप्रकारे आंतरजातीय विवाहद्वारे जातिअंताचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर इभ्रत हा मराठी सिनेमा येऊन गेला आहे.आणि मला वाटत सैराट,हा नागराज मंजुळे यांचा चित्रपट हा अण्णा भाऊ साठे यांच्या आवडि या कांदबरी वरच आधारित आहे. त्यांचा रक्त रंजित शेवट आणी आवडिचा बहिण भावान केलेला खुन या मध्ये साम्य आहे.
जातीय द्वेष आणि वर्ग वाद व खोट्या प्रतिष्ठा साठी जगणारे पांढरपेशी यांचा नकाब अण्णा भाऊनि आवडि कांदबरी मध्ये फाडला आहे.खर्या प्रेमाची जाणिव नसणारे आणि फक्त जातीतील उच्च पणा पाहणारे उच्च वर्णिय आपल्या पोटच्या गोळयाला आणि पाठच्या बहिणीला मरणयातना देणारे जीवन देतात ,आपल्या जातीतील लुळा,दुबळा आणि निष्क्रिय मुलगा आपल्या बहिणीला चालतो पण खालच्या जातीतील, धाडसी, नीतिवान, गुणवान,कमवता मुलगा चालत नाही हि कट्टर जातीतील विषमता दिसते.
हे वास्तव आहे आणि हि वास्तविक ता आवडि कांदबरी मध्ये आहे.
फकिरा हि जग प्रसिद्ध असणार्या कांदबरी मधील फकिरा हा नायक शिलवान ,आणि दया ,क्षमा चे प्रतिक आहे.आपल्या समाजाला उपाशी मरताना बघवत नसल्या कारणाने नैतिक धर्म संभाळत चोरी, लूट स्विकार करतो.
बेडस गावचा इंग्रजांचा खजिना लुटला ,शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा वाघ होऊन एक दिवस जगु असे बळ येणारे प्रेरित विचार फकिरा आपल्या सहकारयाना देत होते .कारण बेडस गावचा खजिना लूटणे म्हणजे मरण सामोरे जाणे होत.पण समाजासाठी मरणाला जाग करणारे धाडसी ,बेडर सहाकारि तयार होते.
खजिना लुटायला गेले तेव्हा रघुनाथ बामणाचे तिथे राखण होते.
तो तलवार घेऊन एका घराच्या दाराला बामण राखन होता.
पण जेव्हा फकिरा त्या बामणाला खजिना कुठे आहे म्हणुन विचारले तेव्हा बामण म्हणाला.... तिकडे आहे तुझ्या पाठीमागच्या खोलीत.
तेव्हा फकिरा ला राग आला आणि फकिरा ने दार उघडले तेव्हा रघुनाथ बामणाचि बायको फकिरा समोर आली आणि म्हणालि बाबा आमचे सर्व दागिने ,घेऊन जावा पण माझ्या या दोन तरूण पोरिंचि लग्न झाले नाहीत. त्यांच्या अब्रू ला हाथ घालु नका,तेव्हा फकिरा त्या बामणाच्या बायकोला म्हणाले "आई मी खजिना घ्यायला आलो आहे.
" अब्रु खाऊन उपाशी माणस जगत नसतात "तुम्ही सगळ्या जणि एका खोलित निवांत बसा.
असे शिलवान फकिरा आणि त्याचे सहकारी या वासनेने भरबटलेलया नराधमांना शिल आणि दया चि शिकवण देतात..
लुटुन आणलेले धान्य, धन,समाजाला सामान वाटा देणारा नायक ,नेता कसा असावा याचे आदर्श उदाहरण फकिरा च्या माध्यमातुन समाजाला अण्णा भाऊ नि सांगितले आहे.
इंग्रजांनी जेव्हा फकिरा ला बेरडचा खजिना लुटला म्हणुन पकडयाचा डाव रचला आणि समाजाला वेठिस धरले , तेव्हा फकिरा यांनी स्वतःचा जीव वाचवा म्हणुन पळ काढला नाही तर समाजासाठी स्वतःला इंग्रजाच्या स्वाधीन केल.
मी मयत झालो तरी चालेल पण माझा समाज जगला पाहिजे हि प्रामाणिक भावना समाजाच्या नेता असणार्या मध्ये ठासुन भरलेले असावी.समाजाचा नायक असावा तर फकिरा सारखा.
हे अण्णा भाऊंनी सांगितले आहे.
वारणेच्या वाघ या कांदबरी मध्ये वारणेच्या खोऱ्यात वाढलेला सतु भोसले जेव्हा एका महार समाजाच्या गरोदर महिला ला शेतात मारताना पाहतो आणि जातीय मानसिकता मधुन तयार झालेल्या कुर्र पणाचा अंत करतो.कारण ति गरिब दुबळि महिला व्यआकुळ होऊन रडत होति तरि तो चौगुले ऐकत नव्हत मारण्याचे कारण काय तर शेताच्या बांधाला लावलेली कुपाटि का उपटले .एवढया छोटया कारणावरून एका गरोदर महिला इतक आमनुष मरण हे सतु च्या संवेदनशील मन सहन करू शकले नाही. आणी चौगुले चे कुर्रौडिने तुकडे केले.
सतु ला वारणेच्या खोऱ्यात सर्व महीला भाऊ म्हणत होत्या.
म्हणजे इतरांसाठी जगणं हे स्वतःहुन स्विकार केला.
आणि तिथुन त्यांना आपल्या जीवनात अनेक संकटाला तोंड द्यावे लागत .या कांदबरी मध्ये अण्णा भाऊंनी माणसाच्या मनाचा शोध घेतला आहे.
आपल्या जगण्यात प्रेमळपणा आणि संवेदनशीलता असली तर स्त्रियांवरील अनन्या ला वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या आयुष्य राख रांगोळी करणारे आदर्श भाऊ या समाजात निर्माण झाले पाहिजे
आता च्या समाजात होणारया घटनांचा वेध घेतला तर अणा भाऊ यांना अपेक्षित संरक्षक भाऊ तयार होणे काळाची गरज आहे.
असे अनेक नायक आणि नाईकांच्या जीवनात घडलेले वास्तव सत्य परिस्थिती आढाव आपल्या साहित्यातून सत्य शोधक ,साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांनी मांडले आहे.
धन्यवाद.
🙏साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🌹🙏🙏🙏
No comments