मेन राजाराम मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणात शिवराज्याभिषेक सोहळा व परिपाठ उत्साहात साजरा कोल्हापूर: शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा न...
मेन राजाराम मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणात शिवराज्याभिषेक सोहळा व परिपाठ उत्साहात साजरा
कोल्हापूर:
शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नाही,ती एक क्रांती आहे,एक मातेच्या संस्कारांनी घडवलेली, मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली,तमाम रयतेच्या मनावर कोरलेली, स्वाभिमानाचं जगणं शिकवणारी,पाच पातशह्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभी राहिलेली, स्वराज्याच्या आसमंतात लिहिलेली जगातील पहिली क्रांती शिवराज्याभिषेक सोहळा होय .आज ६जून शिवराज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर विभागाचे केंद्र समन्वयक डॉ महादेव वांडरे,सुलभक डॉ संतोष जांभळे, डॉ.ज्योती जांभळे -पाटील, श्री.बी.आर.पाटील,श्री.ए.डी.कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रशिक्षणार्थी गट क्रं ४ने परिपाठ सादर केला.यामध्ये संविधान वाचन सुषमा पाटील, प्रार्थना रोहिणी निकम, सुविचार डॉ विजया पाटील,चिंतन सुवर्णा पाटील,दिनविशेष उषा सुतार,परिपाठाचे सूत्रसंचालन डॉ दमयंती जत्राटे व परिपाठाचे समीक्षण बंडगर सर यांनी केले.यावेळी वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
No comments