खड्ड्यांवर ठाम पावले – योगदान न्यूजच्या उपसंपादक अग्नेल चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश; कोल्हापूर महापालिकेकडून वाशी नाका आपटे नगर येथील ख...
खड्ड्यांवर ठाम पावले – योगदान न्यूजच्या उपसंपादक अग्नेल चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश; कोल्हापूर महापालिकेकडून वाशी नाका आपटे नगर येथील खड्ड्याची अखेर दखल
कोल्हापूर | प्रतिनिधि
गेल्या सात-आठ वर्षांपासून वाशी नाका, आपटे नगर येथील मुख्य चौकात असलेला मोठा आणि जीवघेणा खड्डा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. वाहनचालकांपासून ते पादचारी नागरिकांपर्यंत अनेकांनी या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका पत्करला. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधूनही कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आजवर कोणतीच ठोस पावले उचललेली नव्हती.
मात्र अलीकडच्या काही आठवड्यांत योगदान न्यूजचे उपसंपादक अग्नेल चव्हाण यांनी या खड्ड्याविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी या ठिकाणी केलेले व्हिडिओ वृत्तांकन, सामाजिक माध्यमांवरून दिलेला आवाज आणि महापालिकेकडे थेट तक्रार अर्जाद्वारे दाखल केलेली मागणी यामुळे प्रशासनाला जाग येऊन अखेर संबंधित खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली.
लोकशक्तीचा विजय
या कार्यासाठी अग्नेल चव्हाण सरांनी वेळोवेळी प्रशासनाशी पाठपुरावा करत, नागरिकांचे आवाज एकत्र करत ठोस निर्णय घेण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रशासनाने खड्ड्याचे गांभीर्य ओळखले आणि वेळेवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
पत्रकारितेचा सकारात्मक प्रभाव
हा केवळ खड्डा बुजवण्याचा प्रश्न नसून, पत्रकारितेमार्फत लोकांच्या समस्या शासनदरबारी नेण्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. योगदान न्यूजचे उपसंपादक अग्नेल चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे आज वाशी नाका भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कौतुकाची थाप
या यशस्वी पाठपुराव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून अग्नेल चव्हाण सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. आपल्या या यशानंतर अग्नेल चव्हाण सरांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचेही मनापासून आभार मानले आहेत
सामाजिक बांधिलकीतून लोकहिताचा विजय – हीच खरी पत्रकारिता
No comments