सुरज पवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाचे...
सुरज पवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा
गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) दीपक पाटील
सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोकुळ शिरगाव येथील के. डी. पाटील बापू मल्टी ऑब्जेक्टिव्ह संस्थेला मदत केली. या संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या आदित्य प्ले हाऊसच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वस्तू जसे की ड्रेस, दप्तर, वह्या आणि पुस्तके यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील, शाहुवाडी पोलीस स्टेशनचे समुपदेशक विजयसिंह पाटील, तसेच बाळासाहेब मगदूम, संजय शिरगावे, सचिन घोडके, अमित कागले, संतोष पाटील आणि दीपक पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता.
सामाजिक उपक्रमाचा उद्देश:
या प्रसंगी आदित्य प्ले हाऊसचे संचालक दिगंबर पाटील यांनी सांगितले की, आदित्य प्ले हाऊस गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या कामगार वर्गाच्या मुलांना शिक्षण पुरवते. एमआयडीसीजवळ असल्यामुळे गोकुळ शिरगावमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती शिक्षणासाठी पूरक नसल्यामुळे या मुलांना नाममात्र शुल्कात शिक्षण दिले जाते.
दानशूर व्यक्तींना विनंती:
संचालकांनी पुढे सांगितले की, संस्थेला अशा प्रकारे दानशूर व्यक्तींकडून मदत मिळाल्यास शिक्षणाची गंगा पुढे नेण्यास मदत होईल. सुरज पवार यांचे सामाजिक योगदान संस्थेसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
No comments