रुकडी येथे गॅस च्या स्पोटात वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू / प्रतिनिधी, शितल कांबळे रुकडी ता. हातकणंगले येथील पार्वती आण्णासो आंबोळे वय 78 ...
रुकडी येथे गॅस च्या स्पोटात वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू
/ प्रतिनिधी, शितल कांबळे
रुकडी ता. हातकणंगले येथील पार्वती आण्णासो आंबोळे वय 78 यांचा गॅसच्या स्फोटात भाजून मृत्यु झाला त्या मराठी शाळे जवळील आपल्या छोट्याशा खोलीत एकट्याच राहात होत्या. त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान मध्य रात्री 12 च्या दरम्यान स्फोटाचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी , दीपक बागडी यांनी तात्काळ पोलीस पाटील कविता कांबळे व ग्रामपंचायत पदाधिकारी संतोष रुकडीकर , सदस्य शीतल खोत सचिन इंगळे , यांच्याशी संपर्क साधला. या वेळी आगीचा उडालेला भडका इतका मोठा होता की घराच्या भिंतींची पडझड होऊन पत्रे जळून खाक झाले होते . हे पाहून पदाधीकाऱ्यां सह ग्रामस्थांनी आग विझवून आंबोळे यांना वाचवता येईल का या साठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले. या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणीच मृत्यू झाला होता. दरम्यान यावेळी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला असता हातकणंगले पोलिसांनी ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात ही योगदान दिले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास ए.पी.आय यादव करत आहेत
चौकट
संतोष रुकडीकर , शितल खोत , सचिन इंगळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक
घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की मयत आंबोळे या जिवंत आहेत की मयत झाले आहेत हे पाहण्याचे धाडस सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर , शीतल खोत , सचिन इंगळे यांनी केले परिस्थीतीचे गार्भिर्य ओळखून स्वतः पाण्याचा टँकर भरून घेऊन येत आग आटोक्यात आणली, आग आटोक्यात आल्यानंतर तात्काळ स्वतः पडझड झालेले भिंतींचे ढीग बाजूला सारत तात्काळ शव बाहेर काढून शवाविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पुढे पाठवले
No comments