संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड : अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-श्रीरामपूर...
संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड :
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-श्रीरामपूर तालुक्यातील लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी, साहित्यिक राजेंद्र फंड यांच्या निवडीची घोषणा या संमेलनाचे संयोजक साहित्यिक श्री. बाबासाहेब पवार यांनी नुकतीच केली आहे. दिनांक 1 जून 2025 रोजी वडाळा महादेव येथील त्रिंबकेश्वर सभागृहात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक बाबुराव उपाध्ये हे भूषविणार असून उद्घाटक म्हणून उक्कलगाव येथील ह भ.प. बाबा महाराज ससाणे हे भूषविणार आहेत.याचबरोबर प्रमुख मान्यवरांमध्ये वासुदेव काळे, सिद्धिविनायक चेअरमन ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर , कामगार नेते अविनाश आपटे, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, काटे स्वामी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ महाले, पत्रकार प्रकाश कुलथे, पत्रकार विकास अंञे ,करण नवले ,सरपंच चंद्रकलाताई पवार ,चेअरमन धनंजय पवार, संचालक रामभाऊ कसार, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकदिवसीय या साहित्य संमेलनात उद्घाटन सत्राबरोबरच परिसंवाद, भारुड, शाहिरी जलसा, चित्रप्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, गवळणी, दोन सत्रात कविसंमेलन इत्यादी कार्यक्रम पार पडणार आहेत.
साहित्यिक , कवी राजेंद्र फंड हे " आरोग्य विभागात तालुका आरोग्य सहाय्यक पदावर नोकरी करत असून ग्रामसेवा संदेश " या दिवाळी अंकाचे ते सहसंपादक आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून ते दिवाळी अंक काढून मोफत साहित्यिकांना व साहित्य रसिकांना देतात. याचबरोबर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे, कार्याध्यक्ष, सहसचिव हे पदे आतापर्यंत भूषविले असून आता ते प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे ते स्पर्धा प्रमुख म्हणून ही आहेत. कविसंमेलनाचे आयोजन करणे तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविणे असे कार्यक्रम ते वारंवार घेतात. त्यांचे तीन गीतसंग्रह तर " देडगांवचा बालाजी " हे धार्मिक पुस्तक प्रकाशित असून याच धार्मिक पुस्तकावर दूरदर्शनने टेलिफिल्म ही बनविली आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेत कवितेचे रसग्रहण या लेखनप्रकारात त्यांना अनेक वेळ प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहेत. साहित्याबरोबरच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान उपक्रमासाठी कलापथक तयार करून हागणदारी मुक्तीसाठी गावे, शाळा, महाविद्यालय, साहित्य संमेलनात कलापथकाचे कार्यक्रम करून हागणदारी मुक्ती, तंटामुक्ती , आरोग्य जनजागृती केली आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून डायबेटिक उपक्रमाचे ॲम्बेसेडर म्हणून कार्य करतांना वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉपटेनमध्ये राहिले आहे. त्याचबरोबर लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे ते चार्टर प्रेसिडेंट आहेत. राहाता शहर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहिमेत त्यांचा सहभाग आहे. सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला गड किल्ले चढाई मोहीम, गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम, बीजारोपण करण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असतो. आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना व त्यांच्या साहित्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपादक श्री. राजेंद्र देसाई, संपादक श्री. महादेव दळे, संपादक श्री. बाळासाहेब जाधव, संपादक श्री. राजेंद्र नारायणे, ढाकणे एज्युकेशन संस्थेचे श्री. एकनाथराव ढाकणे, ला. गिरीश मालपाणी, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे संस्थापक ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, ला. संजय उबाळे, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, प्राध्या. अशोक कानडे, सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्राध्या. संजय दवंगे, हेमचंद्र भवर, अनिल देसाई, सुधाकर वाघ, सुनील निकम, विलास रोकडे, सागर रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments