* कोल्हापूरच्या मनिष मारुलकर यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून फिडे इन्स्ट्रक्टरची पदवी प्राप्त* कोल्हापूर गुरुवार दिनांक 15 मे :- कोल्हाप...
*कोल्हापूरच्या मनिष मारुलकर यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून फिडे इन्स्ट्रक्टरची पदवी प्राप्त*
कोल्हापूर गुरुवार दिनांक 15 मे :- कोल्हापूर मधील नामांकित प्रशिक्षक मनिष मारुलकर यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून बुद्धिबळ प्रशिक्षकांना देण्यात येणारी फिडे इन्स्ट्रक्टर ही मानाची पदवी नुकतीच जाहीर झाली आहे.
हैदराबाद येथे जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या चेस ट्रेनर सेमिनारमध्ये कोल्हापूरचे मनिष मारुलकर सहभागी झाले होते. अशा आयोजित केलेल्या सेमिनार मधून सहभागी प्रशिक्षकांचे आंतरराष्ट्रीय गुणांकन, त्यांनी आत्तापर्यंत प्रशिक्षक म्हणून केलेली कामगिरी,चर्चासत्रात घेतलेला सहभाग व शेवटी झालेल्या परीक्षेत मिळालेले गुण या सर्वांचे मूल्यमापन करून फिडे प्रशिक्षकाच्या विविध पदव्या( डेव्हलपमेंट इन्स्ट्रक्टर, नॅशनल इन्स्ट्रक्टर, फिडे इन्स्ट्रक्टर व फिडे ट्रेनर इत्यादी ) देण्यात येतात.
तीन दिवस चाललेल्या या सेमिनार व परीक्षेमधून अभूतपूर्व यश मिळवत मनिष मारुलकर यांनी फिडे इन्स्ट्रक्टर ही मानाची पदवी मिळवली आहे. फिडे इन्स्ट्रक्टर ही पदवी मिळवणारे ते कोल्हापूर जिल्ह्यातील व दक्षिण महाराष्ट्रातील आजपर्यंतचे पहिलेच बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत..हे यश मिळवण्यासाठी मनिष मारूलकर यांना भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परिणय फुके व सचिव निरंजन गोडबोले कोल्हापूरचे नामांकित प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
No comments