जोतिर्लिंग फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त 400 लोकांची आरोग्य तपासणी कौलव प्रतिनिधी/संदीप कलिकते जोतिर्लिंग फौंडेशन सामाजिक व शैक्षणिक सं...
जोतिर्लिंग फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त 400 लोकांची आरोग्य तपासणी
कौलव प्रतिनिधी/संदीप कलिकते
जोतिर्लिंग फौंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्था आवळी बुद्रुक , दि आर्ट ऑफ लिव्हिंग कोल्हापूर व आशा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने फौंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात 400 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन शंकर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी बी.एस.पाटील (कॉन्टॅक्टर ) होते स्वागत अध्यक्ष संदीप टिपुगडे यांनी केले सचिव डी.पी. गुरव यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमासाठी सूर्यकांत मर्दाने , माजी प्राचार्य ए .एस .भागाजे ,नेताजी चौगुले तारळे खुर्द , भो. शि . प्र . मंडळाचे व्हा चेअरमन मोहन पाटील ,सचिन पावसकर सर ,दयानंद कांबळे , संपत चव्हाण , शिवाजी बारड ,डॉ . सर्जेराव कवडे ,मिलिंद पाटील ,राजू कवडे ,उपाध्यक्ष स्वप्निल परीट , सदस्य सर्जेराव पाटील , विठ्ठल कांबळे दत्तात्रय पाटील , सागर सरनाईक नवनाथ टिपुगडे , सचिन सुतार आदी उपस्थित होते शेवटी आभार सर्जेराव पाटील यांनी मानले
No comments