Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

शालेय शिक्षणा बरोबरच मुलांच्या अंगातील कला गुणांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.... सुभाष सोनवणे

  शालेय शिक्षणा बरोबरच मुलांच्या अंगातील  कला गुणांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.... सुभाष सोनवणे  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-  प्रा...

 शालेय शिक्षणा बरोबरच मुलांच्या अंगातील  कला गुणांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.... सुभाष सोनवणे 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-  प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणा बरोबरच विविध अनुषंगाने त्यांच्या अंगात असलेल्या सुप्त कलागुणांचे संगोपन व संवर्धन होणे ही आज काळाची गरज झालेली आहे. विद्यार्थी खऱ्या अर्थाने या राज्याचे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.म्हणून त्यांना शाळेतील विविध विषयांचे शिक्षण देत असतानाच शिष्टाचार ,वाचन संस्कृती, मानवता संवर्धन, निसर्ग संवर्धन ,परोपकार ह्या विविध अनुषंगाने  विद्यार्थ्यांच्या मन बुद्धी मेंदूला हे बाळकडू पुरवणे अतिशय गरजेचे आहे. 

पीएमश्री शाळा भारत सरकारचे केंद्र प्रयोजित योजने अंतर्गत असलेल्या अभियानाच्या अनुषंगाने

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देवळाली प्रवरा तालुका राहुरी या शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान देताना साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जालिंदर मुसमाडे हे होते. विचार मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून सदस्य काळे मॅडम तसेच मुख्याध्यापिका श्रीमती पेरणे मॅडम होत्या.

सुभाष सोनवणे यांनी मुलां समोर व्याख्यान देत असताना मुलांशी गोड संवाद साधत त्यांना शिष्टाचार, निसर्ग संवर्धन, मानवता संवर्धन, वाचन संस्कृती, तसेच विविध खेळ, कविता सादरीकरण, भाषण देणे व अभिनयाच्या अनुषंगाने सुद्धा प्रबोधन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक गेय कविता ऐकविल्या .व काही विद्यार्थ्यांना सुद्धा पुस्तकातील काही कविता सादर करावयास  लावल्या.

यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेच्या शिक्षका श्रीमती मुरकुटे मॅडम श्री अंगारखे सर श्री जाधव सर श्रीमती तुपे मॅडम श्रीमती एटाळे मॅडम श्रीमती इनामदार मॅडम श्रीमती कुडके मॅडम श्रीमती पालवे मॅडम श्रीमती आंबेकर मॅडम असे शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुपे मॅडम यांनी केले.तर  सूत्रसंचालन श्री अंगारखे सर यांनी केले. आभार श्रीमती मुरकुटे मॅडम यांनी केले.

No comments