Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

सौ. दीपाली कोरे यांना महिला उद्योजक पुरस्कार – योगदान पोर्टल न्यूजचा सन्मान सोहळा

सौ. दीपाली कोरे यांना महिला उद्योजक पुरस्कार – योगदान पोर्टल न्यूजचा सन्मान सोहळा योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेहलोक...

सौ. दीपाली कोरे यांना महिला उद्योजक पुरस्कार – योगदान पोर्टल न्यूजचा सन्मान सोहळा



योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेहलोक फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी शिव सरस्वती सांस्कृतिक हॉल, वाशी, राधानगरी रोड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा अविस्मरणीय ठरेल, अशी माहिती योगदान पोर्टल न्यूजचे संपादक सागर शेळके यांनी दिली.




कार्यक्रमाच्या तयारीबाबत उपसंपादक अग्नेल चव्हाण यांनी सांगितले की, या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. बाजीराव पाटील, विनायक कोदले, मधुकर खोत आणि युवराज वरुटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सौ. दीपाली कोरे यांना "महिला उद्योजक पुरस्कार"
सौ. दीपाली दत्तात्रय कोरे (वय 33, कपिलेश्वर, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) यांना "महिला उद्योजक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सौ. दीपाली कोरे यांच्या हिरकणी पार्लर आणि अकॅडमीद्वारे त्यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

महिला सक्षमीकरणातील योगदान
सौ. कोरे हेअर, स्किन आणि मेकअप क्षेत्रात बेसिक टू अँडव्हान्स कोर्सचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सौ. कोरे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

सौ. दीपाली कोरे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या मेहनतीची पावती आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या मित्रपरिवारात तसेच त्यांच्या क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments