महाभट्टा रेसिडेन्सी येथे क्षयरोग निर्मूलन मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद आज महाभट्टा रेसिडेन्सी, लक्षतीर्ण क्याहत येथे जागतिक क्षयरोग दिनानिम...
महाभट्टा रेसिडेन्सी येथे क्षयरोग निर्मूलन मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आज महाभट्टा रेसिडेन्सी, लक्षतीर्ण क्याहत येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०९ दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने धारोष्ण अधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अमोल माने, आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी उपस्थितांना क्षयरोग प्रतिबंध व उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान निस्थ मित्रांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी श्री. आदीळकर, श्री. जगदाले, नंदिनी पशिल, सरदार शर्मा, शुभांगी देसाई, शुभम पारील तसेच सर्व आशा सेविका व स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आशा सेविका वैष्णवी जाधव, घाटगे मीनल काकडे, योगिता खोत, काजल पटेल व मुनीर बोबडे यांनी मोलाचे योगदान दिले.
क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून, अशा प्रकारच्या उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली.
No comments