Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

हात्राळ- सैदापूर शाळेच्या खेडकर मॅडम यांचा सेवा पूर्ती समारंभ संपन्न

  हात्राळ- सैदापूर शाळेच्या खेडकर मॅडम यांचा सेवा पूर्ती समारंभ संपन्न  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील हात्राळ सै...

 हात्राळ- सैदापूर शाळेच्या खेडकर मॅडम यांचा सेवा पूर्ती समारंभ संपन्न 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील हात्राळ सैद्दापूर प्राथमिक शाळेच्या पदवीधर सहशिक्षिका जयश्री खेडकर मॅडम यांनी सेवेला आज पूर्णविराम देऊन  शाळेच्या मुलांचा निरोप घेतला या समारंभाच्या वेळी चिमुकल्यांच्या डोळ्याच्या कडा पानावलया होत्या सर्व सहकारी शिक्षक यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही त्यामुळे त्यांनी आपल्या भावनांना डोळ्यातून वाट मोकळी करून दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संभाजीराव बडे हे होते यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक उल्हास बटुळे एकनाथ गायकवाड शैलेश खणकर श्रीमती घुगे मॅडम श्रीमती लाटणे मॅडम प्रतिभाताई खेडकर वीर मॅडम हरिओम केदार सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यावेळी हजर होते



 यावेळी संभाजीराव बडे म्हणाले की श्रीमती खेडकर मॅडम या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व आदर्श शिक्षिका होत्या लहान मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या भावनांचा विचार त्या करत असत मुलां ना सुसंस्कृत करण्याचे कार्य त्यांनी केले आपल्या पवित्र कामाशी त्यांनी कधीच नाळ तोडली नाही शिक्षक हाच मुलांचा आदर्श असतो तो आदर्श शेवटपर्यंत खेडकर मॅडम यांनी जोपासला म्हणून त्यांना निरोप देताना सर्वांनाच गहिवरून आले होते आपल्या सत्कारला उत्तर देताना जयश्री खेडकर मॅडम म्हणाल्या खरा शिक्षक हा शाळा सुटली तरी ज्याची पावले शाळेच्या प्रांगणामध्ये घुटमळतात व त्या पावला सभोवती चार चिमुरडी पावलं गोळा होतात तो खरा शिक्षक असतो आणि तेच कार्य मी माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे केले आहे त्यावर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आपला अभिप्राय व्यक्त केला त्यानंतर शाळेतील शिक्षक व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून मॅडम विषयी आदरभाव व्यक्त केला

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शैलेश खणकर यांनी केले तर एकनाथ गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले

No comments