इंग्लिश स्कूल मध्ये मातृभाषा मराठी हा विषय शासनाने सक्तीचा करावा.-सुभाष सोनवणे (साहित्यिक, व्याख्याते ) (विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने व...
इंग्लिश स्कूल मध्ये मातृभाषा मराठी हा विषय शासनाने सक्तीचा करावा.-सुभाष सोनवणे
(साहित्यिक, व्याख्याते )
(विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने वेधले मान्यवरांचे लक्ष)
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- इंग्रजी भाषा ही ख-या अर्थाने वाघिणीचे दूध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच आय टी क्षेत्रात व नोकरीच्या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा येणे ही आज काळाची गरज झालेली आहे. परंतु मराठी ही मातृभाषा आहे मराठी भाषेतून संत साहित्यावर मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरता करता येईल ती महाराष्ट्राची राज्यभाषा असून तिला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे शासनाने तिचा वापर इंग्रजी माध्यमामधून करावा असे विचार जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी मांडले होते ते हडपसर येथील इंग्लिश मीडियमच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुणे मुंबई सह राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही इंग्लिश स्कूल मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या सर्व इंग्लिश स्कूलमध्ये मराठी मातृभाषा हा विषय शासनाने सक्तीचा करावा. कारण मराठी भाषा ही महाराष्ट्राचे भूषण आहे. तिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. प्रत्येकाच्या घरातून माय मराठी भाषे मधुनच खऱ्या अर्थाने मुलांना बोलावयास शिकवले जाते. कारण ती महाराष्ट्राची बोलीभाषा आहे मराठी भाषेतूनच माता आपल्या मुलांना संस्काराचे धडे देत असतात. मराठी भाषेतून विपुल प्रमाणात संत साहित्यासह अनेक साहित्य कथा कादंबऱ्या प्रवासवर्णने कविता गझल उपलब्ध आहेत. माय मराठी भाषा ही विविध अलंकाराचे अनेक अभूषणे लिहून नटलेली अशी आहे. ती प्रेमळ ,ममताळू व आनंदाळू अशी असून बोलताना आपल्या मनास निवारा देणारी आहे. चैतन्यदायी आहे.ती महाराष्ट्राची राज्य मातृभाषा असल्याने मराठी हा विषय इंग्लिश स्कूलमध्ये शासनाने सक्तीचा करावा.
हडपसर पुणे येथील रोझलीन इंटरनॅशनल स्कूलने आयोजीत केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुभाष सोनवणे यांनी विचारमंचावरून आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विचार मंचावर रोझलीन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नानासाहेब वाघमारे तसेच सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी ,सिने अभिनेत्री संजीवनी कोंडे, सिने अभिनेत्री अविनाश कीर्ती, अमोल बोराटे ,अनिल सावंत, राहुल माने, सुधीर जगताप ,उमेश बाबर ,गीता चौधरी ,प्रतिभा राऊत, सुरेंद्रनाथ सोनवणे असे मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविका मध्ये नानासाहेब वाघमारे यांनी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक संवर्धनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम चालू असतात. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा म्हणून स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा संकुलामध्ये आयोजित केल्या जातात.वेळोवेळी साहित्यिक कवी विचारवंत अशा मान्यवरांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. असे सांगुन त्यांनी स्कूल व इतर बाबीवर प्रकाश टाकला
सदर प्रसंगी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून अनेक प्रकारचे नृत्य सादर केले. उपस्थित प्रेक्षकांचे व प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी स्कूलचे विद्यमान शिक्षक रुंद वेणेसा मॅडम, मेघा जाधव ,सुनिता पाटोळे ,नेहा केंजळे, दिव्या धामणकर ,वैशाली भिसेगावकर, जोत्स्ना स्वामी, आरती सोनकांबळे ह्या शिक्षकांसह स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वॅनेसा मॅडम यांनी केले. तर आभार स्कूलच्या प्रिन्सिपॉल वर्षा वाघमारे मॅडम यांनी मानले या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
No comments