Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम समाप्त झाला दिवसरात्र घामाच्या धारेने भिजणारे ऊसतोड मजूर आज अखेरच्या दिवशी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करत होते.

  साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम समाप्त झाला दिवसरात्र घामाच्या धारेने भिजणारे ऊसतोड मजूर आज अखेरच्या दिवशी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव ...

 साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम समाप्त झाला दिवसरात्र घामाच्या धारेने भिजणारे ऊसतोड मजूर आज अखेरच्या दिवशी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करत होते.



गेल्या कित्येक दिवसापासून अनेक गावांत राहून शेकडो माणसांच्या सहवासाने एक वेगळे नाते निर्माण केलेल्या ऊसतोड मजूरांना निरोप घेऊन जड अंतकरणाने मायदेशी परतावे लागणार आहे . 

करडवाडी येथील बाळासाहेब बाबुराव निकाडे यांच्या 8 जोडी टोळीने चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी 1600 टन ऊसतोड केली आहे. समाधान कारक व्यवसाय झाल्याने शेवटच्या दिवशी ऊस तोड टोळीने गावातून मिरवणूक काढून आनंद व्यक्त केल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी देखील विक्रमी ऊसतोड करणार असल्याचे बाळासाहेब निकाडे म्हणाले.यासाठी त्यांना वडील बाबुराव निकाडे, मुलगा निखिल निकाडे, भाचे प्रथमेश  पाटील (बिद्री ) प्रथमेश मोरे व पुतण्या तेजस निकाडे यांचे विशेष सहकार्य मिळाले



No comments