भारदे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न संपन्न- अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनि...
भारदे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न संपन्न-
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व सेवापूर्ती कार्यक्रम भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक दत्तात्रय जाधव यांचा निरोप समारंभ संस्था व शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा ,शेतकरी नृत्य व विविध गुणदर्शन कार्यक्रमातून लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला.
शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरावर नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी
पंचायत समिती शिक्षण विस्ताराधिकारी डॉक्टर शंकर गाडेकर म्हणाले, प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होणे हा शासकीय नियम जरी असला तरी त्यानंतर आपण समाजसेवेसाठी प्रवृत्त होणे महत्त्वाचे असते. दत्तात्रय जाधव सरांच्या निरोप समारंभ प्रसंगी सर्वांनी व्यक्त केलेल्या स्मरणीय भावना ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी चांगली शाळा मिळणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य असते, संस्कारक्षम उपक्रम व गुणवंत विद्यार्थी घडवण्याची प्रदीर्घ वर्षांची उज्वल परंपरा ही भारदे शाळेची विशेष ओळख आहे. जिद्द, चिकाटी, प्रयत्नाला प्रामाणिकपणाची जोड दिली तर जीवनध्येय नक्की प्राप्त होते.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, रागिनी भारदे, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम धूत, विश्वस्त प्रल्हाद कुलकर्णी, रजनीकांत छेडा,एजाज काझी, प्राचार्य शिवदास सरोदे, सुधीर आपटे , शेषराव देशपांडे, एकनाथ शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक गोकुळ घनवट, उमेश घेवरीकर मुख्य लिपीक सदाशिव काटेकर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य शिवदास सरोदे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर उपप्राचार्य संजय कुलकर्णी यांनी आभार मानले.
No comments