राजळे महाविद्यालयाने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी घेतली लाठी कार्यशाळा अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ...
राजळे महाविद्यालयाने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी घेतली लाठी कार्यशाळा
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात लाठी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅक समन्वयक डॉ. राजू घोलप होते. यावेळी कार्यालयीन अधिक्षक मा. विक्रम राजळे, कला शाखा प्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जे. एन. नेहूल तसेच डॉ. अशोक देसाई, डॉ. अतुल चौरपगार, डॉ. ज्ञानेश्वर कांडेकर, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. प्रदीप धनवडे, प्रा. दुर्गा भराट व प्रा. अमोल धाडगे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. टेमकर यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना पारंपरिक खेळांमधून शारीरिक सुदृढता व कौशल्य कसे विकसित होतात, तसेच नवीन खेळ आत्मसात करून स्पर्धात्मक संधी कशा शोधता येतील, याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेत लाठी इंडिया संस्थेचे डायरेक्टर मा. श्री. महमंदरफी शेख यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिवकालीन मर्दानी खेळातील लाठीचे प्रशिक्षण दिले आणि विविध प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच सह-प्रशिक्षक म्हणून श्री. आदिनाथ गोरे, राष्ट्रीय खेळाडू कु. साहील शेख, कु. श्रुती जाधव, कु. अफसाना नदाफ व श्री. मच्छिंद्र साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कार्यशाळेत लाठी चालवण्याचे विविध प्रकार, स्पर्धेसाठी आवश्यक सराव पद्धती तसेच लाठी चालवताना घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रोहित आदलिंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दशरथ दळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले.
No comments