* संत गाडगेबाबांचे कीर्तन: सामाजिक लोकप्रबोधनाचा मंच!* ---------------------------------------- जयंती विशेष ----------------- संत गाडगेबाबा...
*संत गाडगेबाबांचे कीर्तन: सामाजिक लोकप्रबोधनाचा मंच!*
----------------------------------------
जयंती विशेष
-----------------
संत गाडगेबाबा म्हणून देशभर ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील आगळे वेगळे कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक म्हणून एक विशेष ख्याती प्राप्त व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यभर स्वच्छतेला महत्त्व दिले. स्व इच्छेने त्यांनी सर्वसामान्य राहणीला प्राधान्य दिले समता बंधुत्व ऐक्य न्याय सामाजिक भान ठेवून माणुसकीचा मंत्र त्यांनी जपला. अर्थातच सामाजिक न्याय देण्यासाठी त्यांनी हजारो गावांना स्वतः भेटत राहत आवर्जून भेट दिल्या. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयांमध्ये प्रचंड आवड होती. विसाव्या शतकातील समाज सुधारक आंदोलनांमध्ये ज्या अनेक विविध महापुरुषांचा विशेष सहभाग आहे त्यामध्ये संत गाडगेबाबा यांचे नाव आघाडीवर राहील असे म्हटले तर अति शोक्ती ठरू नये.
संत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक म्हणून परिचित होते. गोरगरीब दुबळ्या अनाथ अपंग शेतमजूर शेतकरी वंचित घटकांसह सर्वसामान्यांच्या पिढी त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या तत्कालीन काळामध्ये गावोगावी होणारे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग होता आपल्या कीर्तनातून त्यांनी समाजातील दांभिक पणा रुढी परंपरा या चुकीच्या पद्धतीवर प्रचंड टीका केली त्या काळात मध्ये सुद्धा अडाणी समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अत्यंत तळमळीने पटवून दिले स्वच्छता आणि चारित्र्य ही मूल्य ही शिकवण गाडगेबाबा त्यांच्या कीर्तनातून देत असत.
गाडगेबाबांनी अज्ञान अंधश्रद्धा स्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य केले. माणसात देव शोधणारे ते संत होते.लोकांनी दिलेल्या देण्यातील पैशांमधून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम आणि विद्यालयाने सुरू केली.
आपल्या कीर्तनातून त्यांनी सर्व त्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण आणि दोषांची जाणीव करून दिली जायची अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये त्यांनी उपदेश केले चोरी करू नका. कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका प्राण्यांची हत्या करू नका जातिभेद अस्पृश्यता पाडू नका हे विचार त्यांनी मांडले. संत तुकाराम महाराजांना त्यांनी आपले गुरु मानले मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते म्हणत असत साध्या भोळ्या लोकांना समजवण्यासाठी त्यांनी ग्रामीण भाषेचा वापर केला. आपले तत्त्वज्ञान पटवून ते देत असत त्यांच्या कीर्तनाचे शब्द चित्र उभे करणे. माझ्या ताकतीबाहेरचे काम आहे असे उद्गार खुद्द बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहे लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पीडीपी नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी देहावसान झाले. या महापुरुषाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले ते अत्यंत शोभून दिसते.
एकूणच, कीर्तनातून लोक शिक्षण देणारे महान विद्यापीठ अर्थात संत गाडगेबाबा ठरले. संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रचंड परिवर्तनवादी कार्याला मनापासून अभिवादन..!
लेखिका-*श्रीमती आशा फड*
( सहशिक्षिका )
संकलन-पत्रकार बाळासाहेब कोठुळे
No comments