Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

शाहीर भारत गाडेकर एक बुलंद आवाजाचा बादशाह-डॉक्टर पी जी ढाकणे

  शाहीर भारत गाडेकर एक बुलंद आवाजाचा बादशाह-डॉक्टर पी जी ढाकणे अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-अहिल्यानगर येथील संपन्न झालेल्या सोळाव्...

 शाहीर भारत गाडेकर एक बुलंद आवाजाचा बादशाह-डॉक्टर पी जी ढाकणे



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-अहिल्यानगर येथील संपन्न झालेल्या सोळाव्या शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये शाहिरी जलसा सत्र पहिले यामध्ये शाहीर भारत गाडेकर व इतर मंडळींनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे पाथर्डी हे होते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील शाहीर ही एक फार मोठी परंपरा आहे स्वातंत्र्याच्या काळात तर शाहिरांच्या आवाजाने व हातातील ड फा ने अक्षरशः लोकांच्या अंगामध्ये चैतन्य निर्माण होऊन धमन्यामध्ये रक्त सळसळत असायची आणि आज शाहीर भारत गाडेकर सरांच्या पहाडी व बुलंद आवाज मधून तो अनुभव सर्वांना अनुभवायला मिळाला असल्याची डॉक्टर पीजी ढाकणे यांनी म्हटले आहे





   यावेळी व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप माजी आमदार लहू कानडे संपत दादा बारस्कर संमेलन अध्यक्ष संजीवनी तळेगावकर पोपटराव पवार काशिनाथ दाते न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब सागडे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे संस्थापक सचिव सुनील गोसावी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे बापूसाहेब भोसले ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर पुरुषोत्तम भापकर जयंत येलू ल कर व इतर मान्यवर होते

  शाहीर  भारत गाडेकर यांच्या भलेरी गीताने अक्षरशः गाजवले सोळावे शब्दगंध साहित्य संमेलनाचे व्यासपीठ

  भलरी म्हणा रे गणा

  धरा सुरात ठेका

  शिवार राख्या गोफण फेका

 या सुरेल शब्दांनी शब्द गंध ची मैफिल आनंदात तल्ली न झाली नकळत सभागृहातील सर्वांचेच ओठ गाण्यांचे शब्द पुटपुटायला लागले यानंतर

  

टाटा बिर्ला बाटा कुठे आहे हो

सांगा धनाचा साठा अन आमचा वाटा कुठे आहे हो

 असे वामनदादा यांचे हे गीत संपताच सभागृहात टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला व यानंतर वंदन माणसाला माणसा इथे मी तुझे गीत गावी बाप लेकाचा सवाल-जबाब अशी एकापेक्षा एक सरस लोकगीतांची मैफिल या ठिकाणी पार पडली यानंतर शाहीर भारत गाडेकर यांच्या पहाडी आवाजात महाराष्ट्र गीत संपन्न झाले

 या संपूर्ण कार्यक्रमासाठी हार्मोनियम सचिन साळवे व राजेंद्र चव्हाण यांनी ढोलकीची साथ संगत केली तर कवी शशिकांत गायकवाड व दिगंबर गोंधळी अशोक कानडे व प्रशांत सूर्यवंशी यांनी कोरस ची साथ दिली या संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन  भगवान राऊत यांनी केले

No comments