नामस्मरणातून ईश्वर चिंतनात विलीन होण्याचा कर्मयोग सांगणारे संत रविदास महाराज सर्वश्रेष्ठ संत-प्राचार्य अशोक दौंड अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळा...
नामस्मरणातून ईश्वर चिंतनात विलीन होण्याचा कर्मयोग सांगणारे संत रविदास महाराज सर्वश्रेष्ठ संत-प्राचार्य अशोक दौंड
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-ईश्वर भक्ती करताना मन चंगा चंगा तो कठोती मे गंगा या उक्तीप्रमाणे रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जीवनाचा अमूल्य संदेश देते संत रविदास महाराजांनी केलेल्या 41 अर्थपूर्ण अभंग रचना गुरुग्रंथ साहेब ग्रंथात समाविष्ट केल्या त्यामध्ये भगवंताकडे मानवी जीवनाचे कल्याणसाठी भगवंताची भक्ती करून जीवनाचे हित साध्य करता येते व मानवाला नामस्मरणाच्या माध्यमातून ईश्वर चिंतनात विलीन होण्याचा कर्मयोग सांगणारे रविदास हे सर्वश्रेष्ठ संत होते असे प्रतिपादन पाथर्डी येथील श्री तीलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक दौंड यांनी केले ते संत रविदास महाराज जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक संघटनेचे नेते आप्पासाहेब शिंदे शाळेचे पर्यवेक्षक दिलावर फकीर भाजपचे ज्येष्ठ नेते अजय भंडारी शाहीर भारत गाडेकर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल पानखडे महेंद्र राजगुरू ह भ प उद्धव महाराज चेन्ने सुरेश मिसाळ आत्माराम दहिफळे अजय शिरसाठ अशोक गरजे समाधान आराख सुभाष भागवत बापूसाहेब कल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते
भारतभूमीला ऋषीमुनींची फार मोठी परंपरा असून शूरवीरांची आणि संतांची पवित्र भूमी आहे इथली माती साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असून अनेक प्रांतामध्ये विविध संत होऊन गेले त्यापैकीच संत रविदास महाराज हे होते . सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री तीलोक जैन विद्यालयामध्ये संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील मोठी परंपरा असणारे ह भ प उद्धव महाराज चेन्ने यांनी माणूस धर्माने नव्हे तर कर्माने ओळखला जातो संत कबीराप्रमाणे सामाजिक समतेचा व सर्व धर्मसमभावाची विचार संत रविदासाने आपल्या अभंग व रचनेमधून मांडल्याचे सांगितले समाजातील दांभिकतेवर प्रहार करणारी लेखणी संत रविदास यांनी त्याकाळी वापरली म्हणून सामाजिक व आध्यात्मिक क्रांती घडून आली असा मौलिक विचार चेन्ने महाराजांनी यावेळी मांडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिश भावसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब गांगुर्डे यांनी मांडले या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाहीर भारत गाडेकर यांनी केले यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments