धाडसाला सलाम: माळुंगे गावचे विनायक पाटील शिवनेरीच्या प्रवासासाठी निघाले कोल्हापूर जिल्ह्यातील माळुंगे गावचे रहिवासी विनायक पाटील यांनी आपल...
धाडसाला सलाम: माळुंगे गावचे विनायक पाटील शिवनेरीच्या प्रवासासाठी निघाले
कोल्हापूर जिल्ह्यातील माळुंगे गावचे रहिवासी विनायक पाटील यांनी आपल्या मित्रांसह बाइकवरून शिवनेरी किल्ल्याचा प्रवास केला आहे. हा प्रवास त्यांच्या धाडस व सहसाला समर्पित होता. विनायक पाटील हे सध्या पुण्यात देहू येथे टू व्हीलर गेरेज चालवतात.
शिवनेरी किल्ल्यापर्यंतचा प्रवास करताना त्यांनी जिद्द आणि धाडसाचे दर्शन घडवले. त्यांच्या या साहसी प्रवासाचे कौतुक आजी-माजी सैनिक वेल्फेअर संघटनेचे सदश्य अरुण दादा मुसळे यांनी केले. "विनायक पाटील यांच्या धाडसाने तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या साहसाचा आदर केला पाहिजे," असे मत मुसळे यांनी व्यक्त केले.
विनायक पाटील आणि त्यांच्या मित्रांनी हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून समाजाला धाडस आणि उत्साहाचा संदेश दिला आहे.
No comments