मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यामध्ये भटक्याची पंढरी म्हणून संप...
मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यामध्ये भटक्याची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या मढी येथील ग्रामपंचायत तिने सर्वानुमते एक ठराव संमत केला असून यावर्षीच्या यात्रा उत्सवामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही अशा आशयाचा ठराव संमत केला आहे या वरती सूचक म्हणून रमेश सुखदेव मरकड यांचे नाव असून बाबासाहेब नाना मरकड यांचे अनुमोदक म्हणून नाव आहे अशी माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली तसेच ग्रामसेवक अनिल सूर्यभान लवांडे व सरपंच संजय बाजीराव मरकड यांच्या त्यावर स्वाक्षरी आहेत दिनांक 13 मार्च ते 30 मार्च या कालावधीत हा यात्रा उत्सव संपन्न होणार आहे या यात्रेला सातशे वर्षाची परंपरा आहे असे सांगण्यात येते रूढी परंपरेनुसार या यात्रेच्या काही प्रथा आहेत त्यामध्ये श्री कानिफनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला या काळात तेल लावले जाते तदनंतर खाटगादी पलंग बाज यांचा वापर करायचा नाही गावामध्ये महिलांनी तसेच व्यापाऱ्यांनी कुठलेही पदार्थ तेलामध्ये तळायचे नाही तसेच शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करायचे नाही लग्नासारखे शुभ कार्य किंवा आनंदोत्सव या काळात टाळावे अशा धार्मिक परंपरा यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने पाळतात मात्र ग्रामस्थांच्या मतानुसार मुस्लिम समाजाकडून या प्रथा खंडित करण्याचा प्रयत्न होत आहे यामध्ये पशुहत्या करणे अमली पदार्थाची विक्री करणे चक्री खेळ स्वरात यासारख्या अवैद्य धंद्यामुळे ग्रामस्थ व राज्यातून येणाऱ्या नाथ भक्तांच्या भावना तीव्र दुखावल्या जातात व त्यामधून गावाची व परिणामी यात्रेची बदनामी होते म्हणून मुस्लिम समाजावर दुकान व्यवसायासाठी बंदी घालण्यात आली आहे असे ठरावात संमत करण्यात आले आहे मात्र या विरोधात आता काही संघटना हा निर्णय असविधानात्मक असल्याचे मत मांडत आहेत यावर येणाऱ्या काळात शासन कोणता कायदेशीर मार्गाचा अवलंब करते हे बघणं गरजेचं आहे
No comments