नानासाहेब भारदे शाळेचे वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारद...
नानासाहेब भारदे शाळेचे वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-
संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे, नानासाहेब भारदे शाळा समिती अध्यक्षा रागिनी भारदे, सहसचिव हरीश भारदे यांच्या प्रेरणेने शाळेने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी हितावह संस्कार उपक्रम राबवले आहेत .
नुकत्याच रोटरी क्लब अहिल्यानगर मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कुल, मराठी शाळा व बाळासाहेब भारदे शाळेच्या मिळून एकूण 94 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
तालुकास्तरावरून सदर स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून चार विद्यार्थी सन्मान चिन्ह व रोख रक्कम पारितोषिक विजेते ठरले आहेत.इयत्ता पहिली ते चौथी लहान गटात वेद मोरे याने प्रथम क्रमांक आरोही शिंदे तृतीय, तर उमेजा शेख हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. इयत्ता पाचवी ते सातवी गटात पृथ्वीराज पोटफोडे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एकूण 800 स्पर्धकांपैकी
सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून शाळेचा संयोजकांमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना निलेश मोरे व रोहिणी बोडखे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा संस्था व शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका परविन काझी , नसीम पठाण ,पर्यवेक्षक गोकुळ घनवट ,उमेश घेवरीकर ,मुख्य लिपिक सदाशिव काटेकर पालक शिक्षक उपस्थित होते.
No comments