पुरस्काराने प्रेरणा मिळते - डी बी बढे (समादेशक) अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- जीवन जगताना आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो...
पुरस्काराने प्रेरणा मिळते - डी बी बढे (समादेशक)
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- जीवन जगताना आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी असलेल्या कामात सातत्य आणि कामाशी एकनिष्ठ असल्यास हमखास त्या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केले जाते,पुरस्काराने प्रेरणा मिळते असे गौरोदगार पाथर्डी होमगार्ड पथक समादेशक डीबी बडे यांनी काढले. पथकातील पलटन नायक श्री राजेंद्र उदारे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा यांचा पत्रकारितेतील जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कवायत मैदान वर त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार ला उत्तर देताना उदारे म्हणाले मनुष्य समूहप्रिय असल्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असते आणि आपल्याला चांगली माणसे सोबत जोडून कार्य केल्यास मानसिक आनंद मिळतो माणसाने नेहमी सत्कार्य यासाठी काम करावे सत्कारासाठी नाही सत्कार आपोआपच होतात चांगल्या गोष्टीत नेहमी सहभाग असावा, व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना समाजाचे आपण काही देणे लागतो हे समजून वागल्यास आपल्या कामाचे कौतुक होतेच त्यामुळे आपल्यालाही नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळते आपण जो माझा सन्मान केलात हे सर्व श्रेय मी आपणाला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना देतो असे म्हणत सर्वांचे आभार मानले.
यावेळी फलटण नायक नवनाथ तरटे ज्येष्ठ होमगार्ड सदस्य रज्जाक शेख, अमोल पवार, ज्ञानेश्वर उकिरडे, आसाराम शेळके,रफिकमेहताब पठाण दत्तात्रय आठरे, महिला होमगार्ड मंगल पुंड यांनी उदारे साहेबाचे कार्याचा ठसा जिल्हा बाहेर उमटल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश औटी, सूत्रसंचालन कमरुद्दीन शेख आभार बाळासाहेब कराड यांनी मानले
No comments