*स्त्रीवादी कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर यांना ११ वे कुसुम पारितोषिक प्रदान*. पत्रकार- सुभाष भोसले कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण संस्था व...
*स्त्रीवादी कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर यांना ११ वे कुसुम पारितोषिक प्रदान*.
पत्रकार- सुभाष भोसले
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण संस्था व पाटगावकर परिवार यांचेवतीने देण्यात येणारे सन 2025 मधील कुसुम पारितोषिक स्त्री मुक्ती चळवळीतील कृतिशील कार्यकर्त्या ॲड निशा शिवूरकर (संगमनेर) यांना प्रदान करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ या स्वरूपात हा पुरस्कार प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या मिना शेशू यांच्या हस्ते निशा शिरूरकर यांना प्रदान करण्यात आला. शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूल सभागृह मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर होत्या. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती आंतरभारती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, संजीवभाई परीख ,संजीव पाटगावकर विनय पाटगावकर, श्रीमती विजयालक्ष्मी पाटगावकर ,प्रा. किसनराव कुराडे ,सुरेश शिपुरकर, सुचिताताई पडळकर आदी मान्यवर व आंतरभारती परिवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोपाला पाणी घालून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक आंतरभारतीचे सचिव एम एस पाटोळे यांनी केले. गेल्या ११ वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्तीला दरवर्षी कुसुम पारितोषिक देऊन गौरविण्यात येत असते. या पारितोषिकाबद्दल सविस्तर माहिती एम एस पाटोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात करून दिली. पाहुण्यांचा परिचय पारितोषिक वितरण समिती सदस्य व आंतरभारतीच्या संचालिका श्रीमती तनुजा शिरपूरकर यांनी करून दिला. स्त्री चळवळीबद्दल विपुल लेखन एड.निशा शिवूरकर यांनी केले आहे. हुंडा प्रतिबंधक चळवळ व स्त्री हक्कासाठी सातत्याने त्या आंदोलना सक्रिय सहभागी असतात अशी माहिती दिली. सत्कारमूर्ती निशा शिवूरकर (संगमनेर )म्हणाल्या, महात्मा गांधी व महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीच्या कार्याचा आरंभ केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सक्रिय सहभाग नोंदविला आहे. स्त्रियांच्या सहभागाशिवाय भारतीय स्वातंत्र्य चळवळ पूर्ण होऊ शकत नाही असे महात्मा गांधीजींचे मत होते . अनेक महिलांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे .या सर्वांच्या प्रेरणेतून आपण आजपर्यंत स्त्रीवादी चळवळीत कार्य करीत आहोत असे प्रतिपादन निशा शिवूरकर यांनी केले. अस्पृश्यता व अंधश्रद्धा यापासून स्त्रियांनी दूर राहिले पाहिजे. ताराबाई शिंदे ,सरोजिनी नायडू अशा अनेक स्त्रियांनी श्रीमुक्ती चळवळीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक काळातील स्त्रियांनी यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले . प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मीनाक्षी शेशु यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्ती एड. निशा शिवूरकर यांच्या स्त्रीवादी चळवळीतील योगदानाबद्दल गौरवउद्गार काढले.स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्त्रियांनी लेखन केले पाहिजे. स्त्रिया अबला नसुन सबला आहेत. स्त्रियांनी निर्धाराने आपल्यावरील बंधने बाजूला केली पाहिजेत .असा विचार मीना शेशू यांनी मांडला. अध्यक्षीय मनोगत आंतरभारतीच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर यांनी मांडले. स्त्रियांच्या चळवळीत स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांनीही आपला अधिकाधिक सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत त्यांनी व्यक्त केले .सूत्रसंचालन श्रीमती पद्मजा महाडेश्वर यांनी केले . आभार सुचिताताई पडळकर यांनी मानले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments