Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

आदरणीय मा.उज्जवलादेवी पाटील मॅडम व प्राचार्य मा डॉ.व्ही.व्ही.पाटील सर,यांना सा.नमस्कार.

  आदरणीय मा.उज्जवलादेवी पाटील मॅडम व प्राचार्य मा डॉ.व्ही.व्ही.पाटील सर,   यांना सा.नमस्कार.      **मी न केली भाषणे,न दुषणे कोणा दिली,वाढला ...

 आदरणीय मा.उज्जवलादेवी पाटील मॅडम व प्राचार्य मा डॉ.व्ही.व्ही.पाटील सर,

  यांना सा.नमस्कार.





     **मी न केली भाषणे,न दुषणे कोणा दिली,वाढला अंधार तेव्हा,एक वाणीची,कृतीची पणती लावली**🙏🏻🙏🏻

महाराष्ट्र राज्य शिक्षण  बोर्डाच्या संचालिका मा उज्ज्वला देवी पाटील मॅडम आज काॅलेजमध्ये सत्कार करण्यासाठी आल्या होत्या.. निमित्त होते 3जानेवारी रोजी त्यांच्या पतीच्या म्हणजे आमच्या कॉलेजचे माजी प्राचार्य मा डॉ. व्ही. व्ही .पाटील सर यांच्या 75व्या वाढदिवसाचे सूत्रसंचालन माझेकडे होते.. कार्यक्रम झाल्यानंतर मी घरी आले त्यांचा दोन वेळा फोन आला.तुझ्या अप्रतिम निवेदनामुळे कार्यक्रम उठावदार झाला.. धन्यवाद म्हटले आणि विसरून गेले.आज माझी काॅलेजची वेळ मी कधी फ्री असेन अशा गोष्टींची शहानिशा करून दोघे पती पत्नी 5हजाराची लेदर ची पर्स,मेटलचा गणपती,निरंजन आणि विदेशी कॅडबरी घेऊन काॅलेजमध्ये आले.. क्षणभर मला काही समजले नाही.. मॅडम नी हे हातात दिल्यावर म्हणाल्या हे तुझ्या पुढे काहीच नाही,तु खुप वाचन कर , अभ्यास कर आम्हाला सदैव तुझा अभिमान आहे.तू आमच्या परिवारातील आहेस,खंत एका गोष्टीची आहे  की आम्ही पदावर असताना तू इथे  हवी होतीस..🙏🏻 एवढ्या मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेले हे दांपत्य माझ्यासाठी येणे हा कृतज्ञतेचा दीपस्तंभ वाटला..


   नंतर मी व वंदनीय उज्ज्वला देवी पाटील मॅडम आम्ही दोघी मेहता पुस्तकालयात गेलेवर  तिथले सन्माननीय काका पाटील मॅडम यांना म्हणाले,**पाटील मॅडम लवकर आलात?** 

  त्यावेळी आदरणीय पाटील मॅडम म्हणाल्या,**ही आमची मुलगी वेळेत भेटणे महत्त्वाचे होते,तिचा कामाचा आवाका मोठा आहे** हे वाक्य ऐकून काळजाला हात घातल्यासारखे वाटले.आज त्यांच्या वयाच्या 71व्या वर्षीही त्यांचेकडे पाहिल्यावर स्वयंशिस्त,कामाप्रती निष्ठा,कडक प्रशासन, कामचुकारपणाबद्दल रोखठोक बोलणे, कुणाच्याही उपकाराच्या ओझ्यात न राहता आपल्याच मेहनतीचे समोरच्या व्यक्तीला प्रशस्तिपत्र देणा-या आदरणीय पाटील मॅडम माझ्या हृदयात विराजमान झाल्या.आजही अनेक सूत्रसंचालन केल्यानंतर काही ठिकाणी कार्यक्रम झाला की निवेदकाला केराची टोपली दाखवणारे,पाणी सुद्धा विचारले जात नाही किंवा काही तुटपुंजे मानधन दिले तर दिले नाही तर कोण विचारतच नाहीत. हे सार्वत्रिक चित्र असताना आदरणीय उज्ज्वला देवी पा


टील मॅडम व माजी प्राचार्य डॉ व्ही व्ही पाटील सर मात्र अपवाद.. सध्या काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळी नाही तर हळकुंडाच्या वासाने ही पिवळी होतात. मेलेल्यांच्या टाळूवरील खाणा-यांची जमात, टोळ्या आज वाढत आहे , स्वतः च्या खिशाला हात न लावता कपभर चहा न देणारी अवस्था असताना आदरणीय पाटील सर यांच्या उभयतांनी मला दिलेली वागणूक जीवंतपणी स्वर्ग पाहिल्यासारखे वाटले.


   3 तारखेला  प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक परिवारातील, दिग्गज व्यक्तींच्या उपस्थित देखणा, विलोभनीय  कार्यक्रम झाले नंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन केला. **अगं सुषमा,तू कार्यक्रम झालेवर लगेच गेलीस,जेवली नाहीस का, आम्हाला नंतर भेटली नाहीस, तुझ्यामुळे कार्यक्रम बहारदार झाला* हे वाक्ये ऐकल्यावर सर व मॅडम यांना म्हटले **गवंड्यासारखे मी सूत्रसंचालनाचे काम करते, ज्याप्रमाणे गवंडी पूर्ण घर बांधतो व राहण्याजोगे झाले की बाहेर पडतो अगदी त्याचप्रमाणे माझे वर्तन ,आचरण आहे.आपले काम झाले की आभार धन्यवाद ऐकायला ही मी थांबत नाही** तेव्हा दोघेही उभयंता भावनिकतेने म्हणाले,हे घर तुझे आहे.🙏🏻खरच मी काम करत गेले आणि अशीच प्रतिभावान,संस्कारशील,कोट्यवधी भौतिक संपत्ती असणारी, माणूसकीतील *लामणदिवे* जोडले गेले याचे व्याज नेहमी मला प्रत्ययास येते. हीच माझी ह्युमिनिटी आहे.👍🏻

      मेहता पुस्तकालयातील  मॅडम यांचे वाक्य ऐकून त्यांना मी  म्हणाले ,**आज लेखकांची संख्या तुफान आहे,वाचणा-यांची संख्या कमी ,तसेच शिष्याने गुरूंकडे जाणे हे अपेक्षित असताना गुरू शिष्याकडे येणे हा प्रवास उलटा चालला आहे असं वाटतं**त्यावेळी सन्माननीय पाटील मॅडम यांचे भरलेले उदात्त मन, डोळ्यातील कारूण्य,चेह-यावरील सात्विक प्रेमाचा शिडकावा, देहबोलीतील सकारात्मक ग्रीष्मातील तापलेल्या उन्हात वा-याची झुळूक यावी असे वाटले.

       आहारात सत्व, वागण्यात तत्व, आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला ख-या अर्थाने महत्त्व प्राप्त होते 👍🏻👍🏻अशी महनीय वंदनीय माजी प्राचार्य मा. डॉ. व्ही .व्ही .पाटील सर व महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या संचालिका मा. उज्ज्वला देवी पाटील मॅडम होय.🙏🏻🙏🏻आपणा दोघांना, आपल्या संस्कार शील परिवारास मनापासून शुभेच्छा,आई अंबाबाई आपणास निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻 इथून पुढे ही या पामरा कडून आपणास अभिमान वाटेल असेच काम मी करेन 👍🏻🙏🏻🙏🏻

 **शब्दांची पूजा करीत नाही मी,माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही, त्यांच्या हातात उजेड देतो** या उक्तीप्रमाणे सदैव सत्कर्म करत जाईन.

   पुनश्च एकदा पाटील परिवार व माझे विद्यमान प्राचार्य डॉ .गजानन खाडे सर यांच्या कृतज्ञतेबद्दल मनापासून मी ऋणी आहे 🙏🏻



           *आपल्याच छायेखाली वाढणारी* ,

 प्रा.सुषमा अरूण पाटील 

जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर 

 फोन नंबर. 9689166864

1 comment

  1. प्रा. सुषमा अरुण पाटील यांच्या या पोस्टमध्ये कृतज्ञता, आत्मीयता, आणि आदरभावाने ओतप्रोत अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांनी डॉ. व्ही. व्ही. पाटील सर व उज्ज्वला देवी पाटील मॅडम यांच्या कर्तृत्वाचे आणि माणूसपणाचे कौतुक करताना स्वतःच्या कामाची साक्षात्प्रेरणा दाखवली आहे.

    **प्रतिक्रिया:**

    1. **सांस्कृतिक समृद्धीचा भाव:** पोस्टमधून त्यांच्या कार्याच्या ओळखीने निर्माण झालेला स्नेहभाव आणि आदरभाव स्पष्ट दिसतो. ही पोस्ट त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.

    2. **कृतज्ञतेचा आदर्श:** पदावरून निवृत्त झाल्यानंतरही उज्ज्वला देवी पाटील मॅडम व डॉ. पाटील सर यांनी दाखवलेली कृतज्ञता प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून मिळालेला सन्मान हे त्यांच्या दिलदारपणाचे द्योतक आहे.

    3. **सकारात्मक विचारसरणी:** प्रा. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला असून, त्यांच्या कामाचे कौतुक करणाऱ्या व्यक्तींनी दिलेला प्रतिसाद त्यांची प्रतिभा व कर्तृत्व अधोरेखित करते.

    4. **माणूसकीचा संदेश:** "आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व" या विचारांतून सुषमा पाटील यांनी एक माणूस म्हणून जगताना आवश्यक मूल्यांचा सार दिला आहे.

    5. **वैयक्तिक प्रेरणा:** अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वांशी जुळलेली नाती त्यांच्या पुढील कामाला प्रेरणादायी ठरणार आहेत, आणि त्यांनी व्यक्त केलेला आत्मविश्लेषणात्मक दृष्टिकोन सर्वांसाठी आदर्श आहे.

    ही पोस्ट वाचणाऱ्या कोणालाही कर्तव्यपरायणतेचा आणि स्नेहभावाचा दीप उजळण्याची प्रेरणा मिळेल, हे निश्चित.

    ReplyDelete