Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन.

  दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन. शिरोळ प्रतिनिधी, सुभाष गुरव  कारखान्य...

 दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन.



शिरोळ प्रतिनिधी, सुभाष गुरव 

कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी, स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक बसगोंडा पाटील  व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.



याप्रसंगी संचालक इंद्रजित पाटील, शेखर पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील,  दरगू गावडे, रावसाहेब नाईक, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, सिव्हील इंजिनियर (प्रोजेक्ट) एल.पी.पाटील, तसेच दत्त ऊस वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर,योगेश पुजारी,तात्यासो पाटील,दादासाहेब कोळी,पंचगंगा संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,विजय माने देशमुख, श्रीकांत पाटील,शामराव कदम,दीपक चव्हाण त्याचप्रमाणे दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

No comments