ह भ प कृष्णा महाराज ताठे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा समाज प्रबोधनकार पुरस्कार प्रदान अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्ड...
ह भ प कृष्णा महाराज ताठे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा समाज प्रबोधनकार पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील समाज प्रबोधनकार ह भ प कृष्णा महाराज ताठे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा २०२५ चा पुरस्कार नुकताच सातारा येथे एका शानदार समारंभामध्ये द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अन्सार शेख राज्य संपर्कप्रमुख श्री बाळासाहेब कोठुळे उपाध्यक्ष जीवन मोहिते व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला ताठे महाराज यांनी आत्तापर्यंत भजन कीर्तन प्रवचन या माध्यमातून अनेक सामाजिक चळवळीमध्ये व अध्यात्मिक क्षेत्रामध्ये परिवर्तनवादी विचारांची पेरणी करून समाजामध्ये अनेक बदल घडवून आणले प्रभावी जनसंपर्क गोड वाणी यामुळे त्यांच्या कार्याची दखल पत्रकार संघाने घेतली तीर्थयात्रेच्या माध्यमातून भारतात अनेक तीर्थक्षेत्राला त्यांनी भेटी दिल्या व अनेक भक्तांना देवदर्शनाचा लाभही घडून आणला आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकतेवर प्रहार करून समाजाला सन्मार्ग लावण्याचे काम ते करत आहेत यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांचे जिवलग मित्र मोहन तात्या आमटे सर्जेराव भाऊ आमटे कांताराम भालेराव प्रदीप आमटे प्रमोद वलवे त्यांच्याबरोबर होते त्यांच्या या यशाबद्दल अध्यात्मिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
No comments